Advertisement

मुंबईत पावसाच्या हलक्या सरी, तापमानातही घट

चक्रीवादळानंतर पुन्हा उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईत पावसाच्या हलक्या सरी, तापमानातही घट
SHARES

सोमवारी सकाळी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसानं मुंबईत हजेरी लावली आहे. मुंबईत सध्या ढगाळ वातावरण असून, अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. सर्वत्र गारवा पसरला आहे. चक्रीवादळानंतर विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा मुंबईत हजेरी लावल्यानं तापमानातही घट झाली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागानं मान्सूनचा पाऊस ८ जूनपर्यंत राज्यात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यामुळं मान्सून दाखल होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सोमवारी सकाळी पडलेल्या पावसामुळं मुंबईत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळं चक्रीवादळानंतर पुन्हा उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. त्याशिवाय, तापमानात काहीशी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. कुलाबा वेधशाळेनुसार, ३१.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान व २७.५ अंश सेल्सिअसकिमान तापमानाची नोंद झाली आहे. तसंच सांताक्रूझ वेधशाळेनुसार, ३३.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान व २७.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. रविवारी कमाल व किमान तापमानाची अनुक्रमे कुलाबा वेधशाळेनुसार ३३ अंश सेल्सिअस व २७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तसंच, सांताक्रूझ वेधशाळेनुसार ३५ अंश सेल्सिअस व २७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

हेही वाचा - Coronavirus Pandemic: मुंबईत 1421 नवे रुग्ण, दिवसभरात 61 जणांचा मृत्यू

राज्यात निसर्ग चक्रीवादळामुळं अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. तसंच, या वादळाचा फटका मुंबईला ही बसला होता. मुंबईतही जोरदार पावसानं हजेरी लावली होती. त्यावेळी या मान्सूनपूर्व पावसामुळं मुंबईच्या सखल भागांत पाणी साचलं होती. परिणामी बेस्टचा वाहतूक मार्गा बदलावा लागला होता.

मान्सून दाखल होण्याची शक्यता

चक्रीवादळापूर्वी हवमान विभागनं यंदा राज्यात लवकर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता. तसंच ८ जूनपर्यंत मान्सून दाखल होणार असल्याचाही अंदाज वर्तवला होता. त्यानुसार १ जून रोजी मुंबईत पावसानं हजेरी लावली होती. मात्र, आता मुंबईकरांना मान्सून प्रतिक्षा असून हवमाना विभागाच्या अंदाजानुसार मान्सून दाखल होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.हेही वाचा -

पोलिसांसाठी वरळी पोलिस कँम्पमध्ये 'शंभर बेड'चे कोविड रुग्णालय

गंभीर कोरोनाग्रस्त रुग्णांनाच मिळावा हाॅस्पिटल बेड- महापौरसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा