आपले कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांच्या संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच वरळी पोलिस वसाहतीत कोविडची बाधाा झालेेेेेेल्या पोलिसांसाठी 100 खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच वरळीचेे नगरसेवक आशिष चेंबूरकर यांनी पोलिस कँम्प परिसरात जागेची पाहणी केली. महाराष्ट्रात सध्या 2562 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 1497 पोलिसांवर उपचार सुरू आहेत. तसेच 1065 रुग्णांमध्ये कोरोनाची अतिसौम्य लक्षणे आढळून आली आहेत. यातील मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. आतापर्यंत या आजाराने 33 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र पोलिस दलातील 196 अधिकारी व 1497 पोलिसांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर उर्वरित पोलिसांमध्ये कोरोनाचेे अतिसौम्य लक्षणे आढळून आली आहेत. त्या पोलिसांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. मागील अनेक दिवसांपासून कोरोना बाधित पोलिसांच्या आकडेवारीत कमालीची वाढ होत होती. यात मुंबई पोलिस दलातील पोलिसांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळेच पोलिसांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने मरोळ आणि सहार वसाहतीतील मोकळ्या इमारतीत या आधीच पोलिसांनी 550 खाटांचे क्वारनंटाइन सेंटर उभारले आहे. माञ दक्षिण मुंबईत राहणाऱ्या पोलिसांसाठी तेे फारच लांब पडत होत्. अशातच वरळी पोलिस कँम्प परिसरात राहणारे पोलिस मोठ्या प्रमाणात या आजाराने ञस्त असल्याचे लक्षात घेता. पालिका आणि राज्यसरकारच्या संयुक्त विद्यमानाने वरळी पोलिस कँम्पमधील मोकळ्या जागेेेत. शंभरखाटांचे कोविड रुग्णालय लवकरच उभारले जाणार आहे. त्यासाठी जागेची पाहणी ही शिवसेनेेेेचे वरळी येथील नगरसेवक आशिष चेंबूरकर यांनी पाहणी केल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
सध्या कोरोना बाधित पोलिसांच्या संख्येत कमालीची घट झाली असली. तरी कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेलेे हजारो पोलिस हे सध्या क्वारनंटाइन आहेत. माञ आनंदाची बाब म्हणजे मागील दोन दिवसात हाताच्या बोटावर मोजण्या इथपर्यंत संख्या वाढली आहे. तर मागील 24 तासात पोलिस खात्यात फक्त एकाच पोलिसाला कोरोना झाल्याचे पुढेे आले आहे. कोरोनाबाधित पोलिस रुग्णांमध्ये मुंबईतील पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. माञ आनंदाची बातमी म्हणजे 500 हून अधिक पोलिस कोरोनामुक्त होऊन बरे झाले आहेत. त्यातील बहुसंख्य पोलिस पुन्हा सेवेत रुजू झाले आहे.
सध्या कोरोनाबाधित 1497 पोलिसांवर राज्यातील विविध सरकारी आणि खाजगी रुग्णालयात तसेच इतर ठिकाणी उपचार सुरु आहेत.तर सुमारे पात हजारहून अधिक पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 33 पोलिसांना आपले जीव गमवावे लागले आहे. मुंबईत पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झालल्यांचा आकडा मोठा आहे. तसेच राज्यात पोलिसांच्या मदतीला केंद्रीय पथके दाखल करण्यात आली आहेत. मात्र या पथकातील जवान देखील कोरोनाच्या कचाट्यातुन सुटले नाहीत. आतापर्यंत 22 जवानाना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.