Coronavirus pandemic: मुंबईत 1421 नवे रुग्ण, दिवसभरात 61 जणांचा मृत्यू

मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता 48हजार 549 इतकी झाली आहे. मुंबईत मागील 24 तासात करोनाचे 1218 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

Coronavirus pandemic:  मुंबईत 1421 नवे रुग्ण, दिवसभरात 61 जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे 91 जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात 1421 नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत रविवारी   दिवसभरात 61 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. 


मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत रविवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 61 रुग्ण दगावले आहेत. तर 1 जून रोजी 40 मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी 2 जून रोजी रोजी एकूण 49 जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, रविवारी मुंबईत कोरोनाचे 1421 नवीन रुग्ण आढळले आहेत.


मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता 48हजार 549 इतकी झाली आहे. मुंबईत मागील 24 तासात  करोनाचे 1218 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण 21 हजार 196 रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

विभागानुसार रुग्णांची संख्या

एच पूर्व – वांद्रे पूर्व -  2610 

के पश्चिम – अंधेरी, विलेपार्ले पश्चिम  -2740

के पूर्व – अंधेरी, विलेपार्ले पूर्व - 2994

एल – कुर्ला -3026

ई – भायखळा, नागपाडा, मुंबई सेंट्रल-2852 

एफ दक्षिण -परळ,  लालबाग, शिवडी -2473

एस – भांडुप, विक्रोळी - 2164

एन – घाटकोपर, विद्याविहार -2361

एफ उत्तर – शीव, वडाळा, अ‍ॅण्टॉप हिल-2882

अतिदक्षता विभागातील(ICU) व्यवस्था - 645

व्हेंटिलेटरवर व्यवस्था-  373

सीसीसी 2 मधील व्यवस्था - 29740

डायलसिस उपकरणे - 92

मुंबईतील कंटेनमेंट झोनची माहिती

कंटेनमेंट झोन (चाळ आणि झोपडपट्टी) - 700

सीलबंद इमारती - 3110

अती जोखीम - 8864

कमी जोखीम 18, 861

सीसीसी 1 मधील अति जोखीम संपर्क - 59, 193


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा