coronavirus : कोरोनाच्या चाचणीसाठी रुग्णालयात जायची आवश्यक्ता नाही, तर...

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यसरकारनं काही कठोर निर्णय घेतले आहेत. सोमवारी सकाळी महाराष्ट्रात १४४ लागू करण्यात आला होता. त्यानुसार नागरिकांनी आपल्या घरी राहणं बंधनकारक होतं. पण तरीही नागरिक घराबाहेर पडले.    

कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी देखील नागरिक कस्तुरबा रुग्णालयात गर्दी करत आहेत. स्वाभाविकच, यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी चिंतेत आहेत. पण आता दिलासादायक बातमी म्हणजे, खाजगी लॅबना नागरिकांच्या घरी जाऊन कोरोनाची चाचणी करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच खाजगी लॅबचे वैद्यकीय अधिकारी घरी येऊन चाचणीसीठी आवश्यक ते नमुने घेतील.   

पालिकेच्या होम स्क्रीनिंग प्रक्रियेचा हा एक भाग आहे. खाजगी कंपन्यांकडून त्यांचे नमुने गोळा करण्यासाठी स्वतंत्रपणे घरी जाणाऱ्या परीक्षकांचा यात सहभाग असेल. महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी म्हणाले की, कुटुंब किंवा कुटुंबातील सदस्यांनी दर्शवलेल्या लक्षणांनुसार, त्यांच्या अलिकडील परदेशी प्रवासाच्या इतिहासाच्या आधारे, परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला आहात की नाही? आणि क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला असल्यास या लॅबशी संपर्क साधावा. तुमच्या या माहितीच्या आधारे तुमचे चाचणीस आवश्यक नमुने गोळा केले जातील.

पालिकेच्या अधिकाऱ्यानं पुढे सांगितलं की, “रुग्णाला घरातच वेगळं ठेवलं जाईल किंवा जास्त गंभीर प्रकरणामध्ये त्याला रुग्णालयात दाखल करून आयसोलेशनमध्ये ठेवलं जाईल.”

आयुक्तांनी नमूद केलं की, कस्तुरबासारख्या रूग्णालयात तपासणीसाठी रूग्णांची गर्दी वाढत होती. २० मार्चपर्यंत जवळपास ८०० नागरिक तपासणीसाठी लाईनीत उभे होते. त्यापैकी बहुतेक कोरोना व्हायरसनं ग्रस्त असू शकतात. रुग्णालयातील हीच गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

सध्या मुंबईत सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे. मुंबईची बस सेवा सध्या सुरू आहे. धक्कादायक म्हणजे, प्रवाशांच्या हातावर क्वारंटाऊनचा स्टँप आहे की नाही याची तपासणी  कंडक्टरद्वारे केली जातेय. क्वारंटाईनचा स्टँप आढळला तर त्यांना बसमधून खाली उतरवलं जातंय.


हेही वाचा

Coronavirus : कोरोनाची मोफत चाचणी करणार वन रुपी क्लिनिक

Coronavirus Test : तपासणी करताना 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा

पुढील बातमी
इतर बातम्या