नवी मुंबई पालिका १११ प्रभागांत लसीकरण केंद्रे उभारणार

नवी मुंबई महापालिकेने (Navi Mumbai Municipal Corporation) कोरोनावरील लस (corona vaccine) खरेदी करण्यासाठी जागतिक निविदा काढली आहे. याअंतर्गत चार लाख लस कुप्या खरेदी करण्यात येणार आहेत. पालिकेने दर दिवशी २५ हजार नागरिकांचं लसीकरण करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. यासाठी लसीकरण केंद्र (vaccination centres) वाढविण्यात येणार आहेत. शहरातील प्रत्येक प्रभागात केंद्र निर्माण करण्यात येणार आहे.

लसीकरणाचं लक्ष्य गाठण्यासाठी पालिका सर्व १११ प्रभागांमध्ये लसीकरण केंद्रे उभारणार आहे. पालिकेच्या शाळांमध्ये ही केंद्र उभारण्याचं नियोजन पालिकेने केलं आहे. पालिकेच्या ५५ शाळा असून लवकरच या ठिकाणी केंद्र उभारण्यात येणार आहेत. शिक्षकांनाही लसीकरणाच्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबतचा पत्रव्यवहार पालिकेकडून मुख्याध्यापकांना करण्यात आला आहे. 

नवी मुंबईत सध्या खासगी व पालिकेची अशी एकूण ५० लसीकरण केंद्रे आहेत. मात्र लस नसल्यामुळे काही केंद्रे बंद आहेत. सध्या पालिकेच्या ३२ केंद्रांवर तसंच जम्बो लसीकरण केंद्रावर लसीकरण होत आहे. 

नवी मुंबई महापालिकेला सरकारकडून अधिकची लस मिळण्याची आशा आहे. याशिवाय पालिका स्वत: लस खरेदी करणार आहे. लस खरेदीसाठी काढलेल्या जागतिक निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने मुदतवाढ दिली आहे. मात्र कंपन्यांशी बोलणे सुरू असल्याने लस मिळेल अशी आशा पालिकेला आहे.



हेही वाचा -

वृक्ष छाटणीची परवानगी अॅपवरून मिळणार, महापालिकेचा मोठा निर्णय

  1. १५ जूनपर्यंत मासेमारीला परवानगी देण्याची मच्छिमारांची मागणी
पुढील बातमी
इतर बातम्या