Advertisement

वृक्ष छाटणीची परवानगी अॅपवरून मिळणार, महापालिकेचा मोठा निर्णय

पावसाळ्यात झाडं कोसळून जीवित आणि वित्तहानी होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

वृक्ष छाटणीची परवानगी अॅपवरून मिळणार, महापालिकेचा मोठा निर्णय
SHARES

आता वृक्ष छाटणी करायची असेल तर महापालिकेच्या ‘MCGM 24 x 7’ या अॅप आणि संकेतस्थळावरून परवानगी घेता येणार आहे. तशी माहितीच मुंबई महापालिकेनं दिली आहे.

“MCGM 24 x 7” हे भ्रमणध्वनी आधारित अँड्रॉइड ॲप गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर आणि ओटीपी पडताळणी (OTP Verification) केल्यानंतर ॲपमधील ‘गो टू सर्विस’ (Go to service) या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर ‘ट्री ट्रिमिंग’ (Tree Trimming) या लिंक अंतर्गत झाडे छाटणी ची ऑनलाइन परवानगी मिळण्याची प्रक्रिया सुरू होते.

महानगरपालिकेच्या “portal.mcgm.gov.in” या संकेतस्थळाद्वारे देखील ऑनलाइन पद्धतीने झाडे छाटणीची परवानगी मिळू शकते. यासाठी महापालिकेच्या सदर संकेतस्थळावर जा. तिथे ‘नागरिकांकरिता’ (For Citizen) या अंतर्गत ‘अर्ज करा’ (Apply) या पर्यायामध्ये ‘उद्यान व वृक्ष’ (Garden & Tree) या पर्यायात झाडे छाटणीच्या परवानगीची ऑनलाइन प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महापालिकेच्या उद्यान खात्याची विशेष बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी उद्यान विभागाला पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगानं आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महापालिकेची पूर्व परवानगी घेऊन झाडांची छाटणी पावसाळ्यापूर्वीच करण्याचं आवाहन महापालिकेचं उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी केलं आहे.

मुंबईत पावसाळ्याच्या काळात झाडं पडून वित्त आणि जीवितहानी होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन याबाबत सर्व संबंधितांनी महापालिकेच्या पूर्व परवानगीनं आपल्या परिसरातील अवास्तव वाढलेल्या झाडांच्या फांद्या सुयोग्य आणि शास्त्रीय पद्धतीने पावसाळ्यापूर्वीच छाटाव्यात, असं आवाहन महापालिकेद्वारे करण्यात आलं आहे.

आवश्यक ती परवानगी प्रक्रिया नि:शुल्क असून परवानगी मिळण्यासाठीचा अर्ज पूर्वीप्रमाणेच महापालिकेच्या विभाग कार्यालयात स्वीकारण्यात येत आहे. याचबरोबर नागरिकांना घर बसल्या वृक्ष छाटणी परवानगीसाठी अर्ज करण्याची सुविधा महापालिकेच्या “portal.mcgm.gov.in” या संकेतस्थळावर आणि “MCGM 24×7” या भ्रमणध्वनी आधारित अँड्रॉइडवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महापालिका नियुक्त ठेकेदाराद्वारे झाडाची छाटणी करावयाची झाल्यास महापालिकेच्या नियमांनुसार विहित शुल्क पालिकेच्या विभाग कार्यालयाकडे जमा करावे. त्यानंतर सामान्यपणे त्यापुढील ७ दिवसांत झाडांच्या छाटणीची प्रक्रिया केली जाते.

महापालिका नियुक्त ठेकेदाराद्वारे छाटणी केल्यास कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्याची कार्यवाही ठेकेदाराद्वारेच केली जाते. झाडे छाटणीसाठी ठेकेदाराद्वारे आकारले जाणारे शुल्क हे झाडाचा प्रकार-आकार आणि संबंधित परिस्थिती यावर आधारित असतो, असं पालिकेनं स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा

पदपथांवर झाडं लावू नका, महापौरांचं मुंबईकरांना आवाहन

तोक्ते वादळात मुंबईत पडली 'इतकी' झाडं, परदेशी झाडं अधिक

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा