मुंबईवर नव्या आजाराचे संकट, गोवंडीत तीन मुलांचा मृत्यू

कोरोना आणि इतर संसर्गाचे आजार पसरत असताना आता मुंबईकरांवर आणखी संकट उभे राहिले आहे. कारण गोवंडी भागात गोवर साथीच्या आजाराचा उद्रेक पाहायला मिळत आहे. यामुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

गोवंडीतील रफीनगर झोपडपट्टीत गोवर आजाराचा उद्रेक झाला आहे. या परिसरात काही दिवसांपूर्वी ४८ तासांच्या कालावधीत तीन मुलांना मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासणीत तिन्ही मुले गोवरचे संशयित असल्याचेही निष्पन्न झाले. आतापर्यंत परिसरात सहा रुग्णांची नोंद झाली असून १३ रुग्ण संशयित आहेत.

एम-पूर्व विभागात असलेल्या गोवंडीच्या रफीनगर झोपडपट्टीतील हसनैन खान (५), नुरीन खान (३) आणि फजल खान (१४ महिने) या तीन मुलांचा २६ आणि २७ ऑक्टोबरला मृत्यू झाला होता. ४८ तासांच्या अवधीत तीन बालकांचा मृत्यू झाल्याने महापालिकेने मुलांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला.

गेल्या 48 तासात 3 मुलांचा गोवरमुळे मृत्यू झालाय. यामुळे आता मुंबई महापालिका (BMC) सतर्क झाली आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईत गोवरची आतापर्यंत 29 प्रकरणं समोर आलीत. या आजारात मुलांना ताप आणि डोळ्यातून पाणी येणे ही लक्षणं दिसतात.

गोवर हा एक संसर्गजन्य रोग आहे. एकमेकांच्या संपर्कात आल्याने तो पसरतो. या मुलांचा शवविच्छेदन अहवाल येणं अजून बाकी आहे. त्यामुळे या मुलांचा मृत्यू गोवरमुळेच झाला की नाही हे स्पष्ट होणार आहे.

Measles (खसरा) हा एक गंभीर आणि जिवाला धोका पोहोचवणारा आजार आहे. खोकणे आणि शिंक यामुळे या आजाराचा फैलाव होतो. लहान मुलांना याचा जास्त धोका असतो. त्यांच्यापासून दुसऱ्या मुलांना हा आजार जडतो. या आजारामुळे गंभीर कुपोषण, निमोनिया आणि मेंदुला ताप चढतो. शरीरावर लाल डाग दिसतात, नाक वाहत राहते. डोळे येणे ही याची लक्षणे आहेत.


हेही वाचा

केईएम रुग्णालय लवकरच 24 तास कार्डिक केअर सेंटर सुरू करणार

पुढील बातमी
इतर बातम्या