Advertisement

केईएम रुग्णालय लवकरच 24 तास कार्डिक केअर सेंटर सुरू करणार

केईएम रुग्णालय ही सेवा देणारे शहरातील पहिले सार्वजनिक रुग्णालय ठरणार आहे.

केईएम रुग्णालय लवकरच 24 तास कार्डिक केअर सेंटर सुरू करणार
SHARES

किंग एडवर्ड मेमोरिअल (केईएम) हॉस्पिटल, परळ लवकरच हृदयविकाराच्या पीडितांना मदत करण्यासाठी 24 तास सुविधा सुरू करणार आहे. इथे रुग्णांवर लवकरात लवकर अँजिओप्लास्टी केली जाईल.

ही सेवा देणारे केईएम रुग्णालय हे शहरातील पहिले सार्वजनिक रुग्णालय ठरणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सध्या अस्तित्वात असलेल्या कॅथ लॅबचे चोवीस तास या सुविधेत रूपांतर करण्यासाठी राज्य सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

विशेषत: तरुण लोकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यांचे उच्च प्रमाण लक्षात घेऊन केंद्र सरकारने अलीकडेच सेगमेंट एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फ्रक्शन (STEMI) कार्यक्रम सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारने सप्टेंबरमध्ये एक प्रकल्प सुरू केला.

अतिरिक्त महापालिका आयुक्त संजीव कुमार म्हणाले, “जीवन वाचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गोल्डन अवरमध्ये रुग्णावर उपचार करणे, जे छातीत दुखण्याचा त्रास जाणवल्यानंतर सहा तासांच्या आत असते.”

त्यांनी असेही सांगितले की रुग्णालयातील केंद्र अशा प्रकारे कार्य करेल की लोक त्यांचे इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ECG) अहवाल डॉक्टरांना व्हाट्सएपद्वारे सामायिक करू शकतील. एकदा डॉक्टरांना खात्री पटली की, रुग्णाला अँजिओप्लास्टीची आवश्यकता आहे, ते त्यांना केंद्रात नेण्यास मदत करतील.

डॉ. संगीता रावत म्हणाल्या, “या उपक्रमामुळे ज्यांना परवडत नाही त्यांना महागडी सेवा मिळेल. प्राइमरी अँजिओप्लास्टी इन मायोकार्डियल इन्फेक्शन (PAMI) जीव वाचवण्यास तसेच हृदयाच्या स्नायूंना होणारे आणखी नुकसान टाळण्यास मदत करते.



हेही वाचा

सायन हॉस्पिटलमध्ये कॅन्सरवरील रेडिएशन थेरपीची सुविधा सुरू होणार

mumbai"="" target="_blank">Mumbai Traffic Update: अंधेरीतील 'हा' ब्रिज २ वर्षांसाठी बंद राहणार">Mumbai Traffic Update: अंधेरीतील 'हा' ब्रिज २ वर्षांसाठी बंद राहणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा