मे महिन्यात कोविड रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याच्या प्रमाणात २३१% वाढ

मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मे महिन्यात मुंबईतील रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोविड रुग्णालयाची संख्या २३१ टक्क्यांनी वाढली. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात कोविडमुळे हॉस्पिटलायझेशनमध्ये 231 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सोमवारपर्यंत, शहरातील रुग्णालयांमध्ये 215 दाखल होते. तर एप्रिलमध्ये हा आकडा 65 च्या घरात होता.

रुग्णांचा आकडा वाढल्यामुळे खाटांचे वाटप करणाऱ्या खाजगी सुविधांमध्येही वाढ झाली आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या किंवा कॉमोरबिडीटी असलेल्या बहुतेक लोकांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. आकडेवारीनुसार, 10 पैकी आठ रुग्ण 60 च्या वर आहेत आणि त्यापैकी दोन रुग्णांना एकापेक्षा जास्त कॉमोरबिडीटी आहे.

गेल्या आठवड्यात, कॅबिनेट मंत्री अस्लम शेख म्हणाले होते की, "राज्यातील कोविड प्रकरणांची संख्या वाढत राहिल्यास आणि 1,000 चा टप्पा ओलांडल्यास, ज्या वेगाने रुग्ण वाढत आहेत ते लक्षात घेऊन महाराष्ट्र आणखी एक लॉकडाऊन लागू करेल." विमान कंपन्यांवर बंदी आहे. अजूनही लागू आहे. जर लोकांनी लक्ष दिले नाही तर, निर्बधांची शक्यता नाकारता येत नाही."

पालिका अधिकाऱ्याने सांगितले की 318 नवीन प्रकरणांपैकी 298 लक्षणे नसलेले होते, तर रुग्णालयात दाखल 20 पैकी फक्त तीन लोकांना ऑक्सिजनची आवश्यक्ता लागली.


हेही वाचा

मंकीपॉक्ससाठी पालिकेची तयारी, रुग्णांसाठी उभारला स्वतंत्र वॉर्ड

मुंबईत सर्वाधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण, रुग्णांमध्ये 35 टक्क्यांनी वाढ

पुढील बातमी
इतर बातम्या