Advertisement

मुंबईत सर्वाधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण, रुग्णांमध्ये 35 टक्क्यांनी वाढ

गेल्या 10 दिवसांत मुंबईत कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत जवळपास 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मुंबईत सर्वाधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण, रुग्णांमध्ये 35 टक्क्यांनी वाढ
SHARES

मुंबईतही हळूहळू कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 10 दिवसांत मुंबईत सक्रिय रुग्णांच्या संख्येत जवळपास 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मुंबईतही कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 10 दिवसांत मुंबईत सक्रिय रुग्णांच्या संख्येत जवळपास 35 टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

मंगळवारी मुंबईत 122 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मंगळवारी दोन रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मंगळवारी 100 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईत महिन्याच्या सुरुवातीला शहरात सक्रिय रुग्णांची संख्या 628 इतकी होती. मंगळवारी ही रुग्णसंख्या वाढून 844 वर पोहोचली आहे. शहरात गेल्या 8 दिवसांत दररोज सरासरी 100 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.

परंतु, रुग्णालयांमध्ये केवळ एक, दोन रुग्ण दाखल होत असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, मुंबईत सध्या 25,249 बेड्सपैकी केवळ 25 बेड्सवरच कोरोना रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्रात मंगळवारी 223 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 161 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 98.11 टक्क्यांवर पोहोचलं आहे.

राज्यात काल (मंगळवारी) दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामळे राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 77,30,370 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत राज्यात एकूण 8,04,22,318 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.



हेही वाचा

जून, जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट येणार?, राजेश टोपे म्हणाले...

गुड न्यूज! आता मुंबईकरांना 'या' केंद्रावर मोफत बुस्टर डोस मिळण्याची शक्यता

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा