Coronavirus : मुख्यमंत्र्यांचे संरक्षण करणारे १०० हून अधिक पोलिस क्वारंटाइन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कलानगर इथल्या मातोश्री निवासस्थानाजवळ सोमवारी चहाची टपरी चालवणाऱ्या चहावाल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. हे समोर आल्यानंतर मातोश्रीवर संरक्षणासाठी नेमलेल्या १०० हून अधिक पोलिसांना क्वारंटाइन करण्यात आल्याचं समजतंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या निवासस्थानी १७० पोलीस बंदोबस्तावर असतात असे समजते. खबरदारीच्या उपाय म्हणून १०० पेक्षा अधिक पोलिसांना क्वारंटाइन केले गेले असल्याचे सांगितले जात आहे. मातोश्रीच्या गेट नंबर दोन जवळ ही चहाची टपरी आहे. वांद्रा इथला हा सर्व परिसर सॅनीटाइज केला गेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे गेस्टहाउस इथून जवळच असल्याचं समजतं. कलानगर सील केलं गेलं असून इथली वाहतूक बंद केली गेली आहे.

कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचं दिसताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या ड्रायव्हरला सुट्टी दिली होती. ते स्वत:च कार चालवत बैठकांना उपस्थित राहत आहेत. भेटी गाठीही त्यांनी या आधीच बंद केल्या असून फक्त महत्त्वाच्या बैठकांनाच ते उपस्थित राहत आहेत. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधत आहे.

दरम्यान कोरोनाचा हा संसर्ग आता नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांपर्यंत पोहचला आहे. कुरार पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाला कोरोनाची लागन झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्याची कोरोनाची टेस्ट पाँझिटीव्ह आल्याने त्यांच्यासोबत असलेल्या आता इतर पोलिस कर्मचाऱ्यांची आता कोरोनाची चाचणी केली जाणार आहे.


हेही वाचा

Coronavirus Update : भारतात PPE सुटची कमतरता, चीनकडून मदतीचा हात

मुंबईतले ‘हे’ ४ वाॅर्ड अतिधाेकादायक, जपून राहण्याचा प्रशासनाचा सल्ला

पुढील बातमी
इतर बातम्या