Advertisement

coronavirus update : भारतात PPE सुटची कमतरता, चीनकडून मदतीचा हात

भारतात प्रोटेक्‍शन एक्विपमेंट (PPE) सूटची कमतरता आहे.

coronavirus update : भारतात PPE सुटची कमतरता, चीनकडून मदतीचा हात
SHARES

भारतात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवसवाढ होत आहे. सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रातच आहेत. चीनमधल्या वुहान या शहरात सुरुवातीला कोरोनानं धुमाकूळ घातला. पण सध्या चीनमध्ये लॉकडाऊनमुळे कोरोनाला अटकाव घालण्याल चीन सरकारला यश आलं आहे. आता चीन अनेक देशांना मदतीचा हात पुढे करत आहे. भारतात प्रोटेक्‍शन एक्विपमेंट (PPE) सूटची कमतरता आहे. त्यामुळे चीननं भारताला १ लाख ७० हजार PPE सुट दिले आहेत. सोमवारी हे सर्व सूट मिळाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली.


डॉक्टर्ससाठी सुट

भारतात २० हजार सूटची निर्मिती करण्यात आली आहे. ज्या राज्यांना जास्त गरज आहे अशा राज्यांना हे सुट पाठवले जणार आहेत. अशा राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना आघाडीवर लढावं लागतं अशा कर्मचाऱ्यांसाठी ते सुट वापरले जाणार आहेत.


४ अतिरोधक वॉर्ड

कोरोनाला (coronavirus) रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असतानाही महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालल्याने राज्य सरकारची डोकेदुखीही वाढली आहे. खासकरून मुंबईत कोरोनाची साखळी वेगाने पसरत असल्याचं दिसून येत आहे. आधी केवळ परेदशातून आलेल्या तसंच त्यांच्या संपर्कात आलेल्यांपुरताच मर्यादीत असलेला कोरोना आता झोपडपट्ट्यांमध्येही (slum) शिरकाव करू लागला आहे. काही ठिकाणी तर कोरोनाचे रुग्ण दर दिवसागणिक सापडत आहेत. या दृष्टिकोनातून मुंबईतील ४ वाॅर्ड अतिधोकादायक मानण्यात आले आहेत.


२४३ परिसर सील

महाराष्ट्रात सद्यस्थितीत ८६८ कोरोनाबाधित (corona patient) रुग्ण आढळले असून त्यातील ५२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सर्वाधिक ५२५ कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. ठिकठिकाणी कोरोनाबाधीत रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाकडून संबंधित परिसर सील करून ठेवण्यात येत आहे. मुंबईमध्ये सद्यस्थितीत २४३ परिसर सील करण्यात आले आहे. सील करण्यात आलेल्या परिसरातील रहिवाशांना आत जाण्यास किंवा बाहेर येण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा