रिलायन्स लाईफ सायन्सकडून करोनाची चाचणीसाठी आवश्यक किट्स आणि साहित्य आयात केली जात आहेत. रिलायन्सचे डॉक्टर आणि संशोधक ओव्हर टाइम करुन या जीवघेण्या व्हायरसविरोधात लढा देत आहेत, अशी माहिती कंपनीने दिली. रिलायन्स प्रति दिन १० लाख मास्क निर्मिती करण्याची तयारी करत आहे. यासोबतच खाजगी सुरक्षा साहित्य निर्मिती करण्यावरही भर दिला जात आहे. कोरोना व्हायरसविरोधात दोन हात करत असलेल्या डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक कपडेही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
हेही वाचा -
१०वी-१२वीच्या उत्तरपत्रिका शिक्षक घरीच तपासणार
Corona Virus : जे.जे.तील कोरोनाच्या चाचणी व उपचारासाठी तयारी पूर्ण