Advertisement

Corona virus : जे.जे.तील कोरोनाच्या चाचणी व उपचारासाठी तयारी पूर्ण


Corona virus : जे.जे.तील कोरोनाच्या चाचणी व उपचारासाठी तयारी पूर्ण
SHARES

कोरोनाविरोधात सरकार सज्ज असून मोठ्या प्रमाणात विविध रुग्णालयात कोरोना चाचणी व उपचारासाठीची तयारी अंतिम टप्यात आहेत. तर जेजे रुग्णालयातील चाचणी केंद्र हे पूर्ण झाले असून लवकरच ते रुग्णांसाठी खुले केले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.   भायखळा येथील जे.जे. रुग्णालयात निर्माण करण्यात आलेल्या चाचणी केंद्र आणि कोरोनाबाधित रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची पाहणी मंत्री देशमुख यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. 

हेही वाचाः- Coronavirus: उपहारगृहे सुरु ठेवणा-यांना करावे लागणार 'या' अटींचे पालन

कोरोनाविरोधातील ही लढाई जिंकण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी सज्ज असून त्यांना आवश्यक सर्व मदत शासन देईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह संपूर्ण शासनव्यवस्था खंबीर आहे. शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन सर्वांनी करणे आवश्यक आहे. जे.जे. रुग्णालयासह पालिकेतील केईएम, नायर शताब्दी, सायन, या सारख्या पालिकेच्या रुग्णालयात कोरोना चाचणी आणि विलगीकरण कक्षाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. लवकरच हे केंद्र रुग्णांच्या चाचणी अथवा उपचारासाठी खुले केले जाणार आहे. मात्र शक्य तितका हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, सरकारी आदेशांचे पालन करावे. आवश्यक असल्यास घराबाहेर पडावे. असे आवाहन अमित देशमुख यांनी केले आहे. 

हेही वाचाः- मुंबईतल्या 'या' ४ खाजगी लॅबना कोरोना व्हायरसच्या तपासणीची परवानगी

भायखळा येथील जे.जे. रुग्णालयात कोरोना अर्थात कोविद १९ या विषाणूचे चाचणी केंद्र विक्रमी वेळेत उभे करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक सर्व यंत्रसामग्री बसविण्यात आली आहे. त्याची दिवसाला १५0 चाचण्या घेण्याची क्षमता आहे. ही क्षमता १000 पर्यंत वाढविता येते. या चाचणी केंद्रासोबतच करोनाबाधितांसाठी ७0 खाटांचे विलगीकरण कक्ष आणि १0 खाटांचे अतिदक्षता केंद्र सुरू करण्याची तयारी पूर्ण करण्यात आली असून त्याची पाहणी देशमुख यांनी केली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा