Advertisement

मुंबईतल्या 'या' ४ खाजगी लॅबना कोरोना व्हायरसच्या तपासणीची परवानगी

कोरोनाव्हायरस टेस्टिंग लॅब सुरू करण्यासाठी २० कंपन्यांकडून अर्ज प्राप्त झाले. त्यातल्या केवळ चार कंपन्यांनाच मान्यता मिळाली आहे.

मुंबईतल्या 'या' ४ खाजगी लॅबना कोरोना व्हायरसच्या तपासणीची परवानगी
SHARES

इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चनं (ICMR) चार नवीन खासगी रुग्णालये / आरोग्य संस्थांना कोरोना व्हायरसची चाचणी घेण्यास मान्यता दिली आहे. आतापर्यंत, केवळ कस्तुरबा हॉस्पिटल आणि केईएम हॉस्पिटल सारख्या संस्था कोरोनाव्हायरस चाचण्या घेत आहेत आणि तेही विनामूल्य. आयसीएमआरनं नमूद केले की, कोरोनाव्हायरस टेस्टिंग लॅब सुरू करण्यासाठी २० कंपन्यांकडून अर्ज प्राप्त झाले. त्यातल्या केवळ चार कंपन्यांनाच मान्यता मिळाली आहे.

  • थायरोकेअर (Thyrocare)
  • सबर्न डायगनॉस्टिक (Suburban Diagnostics)
  • मेट्रोपोलीस हेल्थकेअर एलटीडी मुंबई (Metropolis Healthcare Ltd Mumbai)
  • एच एन रिलाईन्स फाऊंडेशन हॉस्पीटल (H N Reliance Foundation Hospital)

हिंदुजा रुग्णालयाला देखील लवकरच परवानगी मिळण्याची अपेक्षा आहे. भायखळा इथल्या जेजे हॉस्पिटल आणि परळच्या हफकीन इन्स्टिट्यूटमध्ये देखील चाचणी केंद्र उभारले जाण्याची शक्यता आहे.

चाचणी घेण्यास परवानगी असलेल्या रूग्णालयांना आयसीएमआरनं आदेश दिले आहेत की, प्रति चाचणीची किंमत ४ हजार ५०० रुपये इतकी असावी. याशिवाय संशयित रुग्णामध्ये कोणती लक्षणं दिसत नसतील तर त्यांच्या अधिकाधिक वेगवेगळ्या चाचण्या तुम्ही घेऊ शकता.

आरोग्यसेवा पुरवणारे कर्मचारी आणि इतर आजारानं ग्रस्त नागरिकांनी कुठलाही परदेशी प्रवास केला नसला तरी तपासणी करून घेण्याची शिफारस केली आहे. कारण या जागतिक महामारीच्या दरम्यान हे दोन सर्वात असुरक्षित गट आहेत.  



हेही वाचा

Coronavirus : कोरोनाच्या चाचणीसाठी रुग्णालयात जायची आवश्यक्ता नाही, तर...

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा