Advertisement

Coronavirus: उपहारगृहे सुरु ठेवणा-यांना करावे लागणार 'या' अटींचे पालन


Coronavirus: उपहारगृहे सुरु ठेवणा-यांना करावे लागणार 'या' अटींचे पालन
SHARES
 
कोरोना व्हायरसचा दिवसेंदिवस प्रसार वाढतच आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या आता 97 वर जाऊन पोहचली आहे. महाराष्ट्रात पसरत चाललेला फैलाव थांबविण्यासाठी महाराष्ट्रात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) ठेवण्यात आले आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवा सुरु राहतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे स्पष्ट केले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, आस्थापना, खासगी कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी मुंबईतील अत्यावश्यक सेवा कोणकोणत्या असतील याबाबतची नियमावली तयार केली आहे. या नियमावलीत उपाहारगृहे सुरु ठेवण्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे हा काळ आपल्यासाठी खूपच चिंताजनक असल्याचे उद्धव ठाकरे यांनी आपल्या व्हिडिओ द्वारा सांगितले. त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात 31 मार्च पर्यंत लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. या दरम्यान उपहारगृहे सुरु ठेवण्यासाठी शासनाने काही अटी घातल्या आहेत. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. पालिकेने बंदच्या काळात आपल्या अटी काहीशा शितिल केल्याचे निदर्शनास आले आहे. बंदच्या काळात ज्या हाँटेल मालकाला किंवा उपहारगृह सुरू ठेवायचे असेल. तर इतर वेळीपेक्षा 50% ग्राहकांना प्रवेश द्वाला लागेल.


तसेच प्रत्येक ग्राहकाच्या मध्ये तीन फूटाहून अधिक अंतर असणे बंधन कारक राहणार आहे. शक्यतो घरपोच आँर्डर हाँटेल मालक स्विकारू शकतो. या सारख्या अटी पालिकेने हाँटेल मालकांना घातलेल्या आहेत.कोरानाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन रविवारी राज्यात १४४ कलम लावण्यात आलं. त्यानंतरही लाेकं आपल्याला काही होणार नाही, अशा अविर्भावात फेरफटका मारायला बाहेर पडत आहेत. त्यामुळे मला नाईलाजाने राज्यात संचारबंदी लावावी लागत आहे. या संचारबंदीच्या काळात ५ पेक्षा जास्त लोकं घोळक्याने दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. 

या आहेेत अटी:


1. एकावेळी क्षमतेच्या 50 टक्केच ग्राहक बसतील, याची काळजी मालकांना घ्यावी लागणार आहे.

2. दोन ग्राहकांमध्ये तीन फुटांचे अंतर ठेवून त्यांची आसनव्यवस्था करावी लागणार आहे.

3. खाद्यपदार्थ घरी घेऊन जाण्यास किंवा घरपोच देण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

वर दिलेल्या नियमांचे पालन न झाल्यास उपहारगृहांच्या मालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे ही प्रशासनाने सांगितले आहे.


वाहतुकीवर मर्यादा

सार्वजनिक वाहने तर बंदच आहेत. पण खाजगी वाहनेसुद्धा अत्यावश्यक कारणांसाठीच सुरु राहतील. रिक्षात एक ड्रायव्हर आणि एक प्रवासी आणि टॅक्सीत एक ड्रायव्हर आणि २ प्रवासीच असतील. जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्न धान्य तसंच त्यांची ने आण करणारी वाहने सुरु राहतील. पशू खाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील. कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरु राहील.  


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा