नवी मुंबईत खाजगी रुग्णालयांकडून ३२ लाख रुपये रुग्णांना परत

नवी मुंबईतील खाजगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांकडून जादा बिल आकारले होते. पालिकेच्या कारवाईनंतर रुग्णालयांनी अधिकचे बिलाचे पैसे रुग्णांना परत देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत रुग्णांना ३२ लाख रुपये रुग्णालयांनी परत केले आहेत.  पी. के. सी हॉस्पिटल (वाशी), एम. पी. सी. टी हॉस्पिटल (सानपाडा), एम. जी. एम. हॉस्पिटल (बेलापूर), फोर्टिस हॉस्पिटल (वाशी), डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल (नेरुळ), रिलायन्स हॉस्पिटल (कोपरखैरणे), अपोलो हॉस्पिटल (बेलापूर), ग्लोबल हॉस्पिटल (वाशी), राजपाल हॉस्पिटल (कोपरखैरणे), तेरणा हॉस्पिटल (नेरुळ) तसेच सनशाईन हॉस्पिटल (नेरुळ) या हॉस्पिटलांनी रुग्णांकडून ज्यादा आकारलेले बिलाचे ३२ लाख रुपये परत केले.खाजगी रूग्णालये शासनाने जाहीर केलेल्या दरांपेक्षा जास्त दर आकारात असल्याच्या तक्रारी नवी मुंबई महापालिकेकडं आल्या आहेत. रूग्णालयांची नागरिकांना सुलभपणे विनासायास आपली तक्रार नोंदविता यावी व त्यावर विहित वेळेत योग्य कार्यवाही व्हावी यासाठी पालिकेने आता एक काॅल सेंटर सुरू केलं आहे. याकरिता ०२२- २७५६७३८९ हा दूरध्वनी क्रमांक तसंच ७२०८४९००१० हा व्हॉट्स ॲप क्रमांक संपर्कासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीत तळमजल्यावर  ७ सप्टेंबर पासून सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत 'कोव्हीड बिल तक्रार निवारण केंद्र  सुरू करण्यात येत आहे. या विशेष केंद्राकरिता ०२२- २७५६७३८९ हा हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात येत असून कोव्हीड रूग्ण अथवा त्यांचे नातेवाईक कोव्हीड बिलांविषयीच्या तक्रारीसाठी त्यावर संपर्क साधू शकतील.


हेही वाचा -

राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं ‘या’ विषयावर पत्र

बलात्काराच्या गुन्ह्यात ‘या’ अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक


पुढील बातमी
इतर बातम्या