कोरोनानंतर 'या' आजाराचा मुंबईत शिरकाव, ३१ जणांचा मत्यू

मुंबईत कोरोना (Coronavirus Update) रुग्णाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वात जास्त रुग्ण अंधेरी ते दहीसर या पट्ट्यात आढळत आहेत. आधीच कोरोनाचं संकट डोक्यावर आहे. त्यात आता एका नव्या आजारानं डोकं वर काढलं आहे. कोरोनानंतर सारी (SARI) या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे.

सारीच्या रुग्णांमध्ये वाढ

मुंबईजवळील (Mumbai News) भिवंडी शहरात कोरोना पाठोपाठ सारी या आजाराचा फैलाव होत आहे. स्व. इंदिरा गांधी कोविड -19 शासकीय रुग्णालयात सारी आजाराचे २३१ रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी ३१ जणां चा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे या रुग्णालयात कोरोनाचे १९० रुग्ण आहेत. सर्वात जास्त रुग्ण सारी या आजाराचे आहेत.  

सारी म्हणजे काय?

सारी या आजारामध्ये रुग्णाला ताप येतो. खोकला आणि श्वास घेण्यासही त्रास होतो. अशा रुग्णाला दवाखान्यात दाखल करावं लागतं. COVID 19 ची लक्षणं पण साधारण सारखीच आहेत. मुख्यत: असे रुग्ण न्युमोनिया या आजारामुळे दवाखान्यात दाखल होतात. सारी या आजारामध्ये फुफ्फूस जास्त जास्त प्रभावित होते. त्यामुळे किडनी, लिव्हर निकामी होण्याची शक्यता असते.


हेही वाचा

Coronavirus Pandemic: मुंबईत ७३ हजार ७९२ रुग्णांनी केली कोरोनावर मात

पुढील बातमी
इतर बातम्या