Advertisement

Coronavirus pandemic: मुंबईत ११४४ नवे रुग्ण, दिवसभरात ३८ जणांचा मृत्यू

मुंबईत मागील २४ तासात करोनाचे २४३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ३७ हजार १० रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

Coronavirus pandemic:  मुंबईत ११४४ नवे रुग्ण, दिवसभरात ३८ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे २०८ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात ११४४ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत बुधवारी  दिवसभरात ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः- death rate in Mumbai : मुंबईतील मृत्यूदर पुन्हा ५ टक्क्यांवर

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत बुधवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३८ रुग्ण दगावले आहेत. तर २३ जून रोजी ४२ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २२ जून रोजी रोजी एकूण २० जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, मंगळवारी मुंबईत कोरोनाचे ११४४ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ६९ हजार ६२५ इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात  करोनाचे २४३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ३७ हजार १० रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- ३० मिनिटात कोरोनाचं निदान, पालिकेचं 'मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग'

राज्यात आज ४१६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून  एकूण संख्या ७३ हजार  ७९२ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५१.६४ टक्के एवढे झाले आहे. आज कोरोनाच्या ३८९० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ६२ हजार ३५४ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. राज्यात आज २०८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ७२ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १३६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत.  सध्या राज्यातील मृत्यूदर  ४.७२ टक्के एवढा आहे.  मागील ४८ तासात झालेले ७२ मृत्यू हे मुंबई मनपा-३८, ठाणे मनपा-१, कल्याण-डोंबिवली मनपा-१, भिवंडी-निजामपूर मनपा-१, नाशिक मनपा-४, जळगाव-१, नंदूरबार-१, पुणे-२, पुणे मनपा-१०, पिंपरी-चिंचवड मनपा-२, सोलापूर मनपा-४, रत्नागिरी-२, जालना-१, उस्मानाबाद-२, अकोला मनपा-२, बुलढाणा-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहेत.

0 सक्रीय कंटेनमेंट झोन (चाळ)  ७६५

0 सीलबंंद इमारती ६११६

0 २४ तासातील संपर्काचा शोध अति जोखिम  ५०५५

0 CCC1 मधील अति जोखीम  १७४११

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा