परदेशी जाणाऱ्या व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठी नवी मुंबईत स्वतंत्र कक्ष

नवी मुंबई महापालिकेच्यावतीने (Navi Mumbai Municipal Corporation) परदेशात (abroad) शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता (student) ३ वेळा विशेष लसीकरण सत्रे राबविण्यात आलेली आहेत. याशिवाय परदेशात शिक्षण, नोकरी तसेच टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेत जाण्याकरिता कोव्हीशील्ड लसीचा (vaccine) दुसरा डोस आवश्यक असल्याने २८ दिवसानंतर दुसरा डोस देण्याबाबत विचारणा करण्यात येत आहे. या अनुषंगाने शासनामार्फत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 

 त्यानुसार परदेशी विद्यपीठात शिक्षण, परदेशात नोकरी तसेच टोकिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी जाणारे ॲथलीट, खेळाडू व संबंधित स्टाफ यांना लसीचा दुसरा डोस पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांचा कालावधी झाल्यानंतर दिला जाणार आहे.

यासाठी संबंधितांनी परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळाल्याची आवश्यक कागदपत्रे, परदेशात नोकरी मिळत असल्याबाबतची कागदपत्रे तसेच टोकिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याकरिता प्राप्त नामनिर्देशनपत्र सादर करणे गरजेचे आहे. नवी मुंबई महारपालिका मुख्यालयात तिसऱ्या मजल्यावर आरोग्य विभागामध्ये यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून संबंधितांनी दुपारी २ ते ६ या वेळेत याठिकाणी आपली कागदपत्रे दाखवून लसीच्या  दुसऱ्या डोसची परवानगी प्राप्त करून घ्यावयाची आहे.

लसीकरण नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेक्टर १५ नेरूळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालयात जाऊन करून घ्यावयाचे आहे.  शिक्षण, नोकरी अशा महत्वाच्या कामांसाठी तसेच टोकिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याकरिता परदेशी जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पालिकेने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.  याचा लाभ संबंधितांनी करून घ्यावा असं आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलं आहे.

 


हेही वाचा -

३० ते ४४ वयोगटाचं मोफत लसीकरण

बनावट ओळखपत्रावर लोकल प्रवास करत असाल तर सावधान!

पुढील बातमी
इतर बातम्या