Advertisement

बनावट ओळखपत्रावर लोकल प्रवास करत असाल तर सावधान!

मुंबईतली लोकल सेवा सद्यस्थितीत केवळ अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी सुरु आहे.

बनावट ओळखपत्रावर लोकल प्रवास करत असाल तर सावधान!
SHARES

मुंबईतली लोकल सेवा सद्यस्थितीत केवळ अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी सुरु आहे. मात्र, काही नागरिक अत्यावश्यक सेवांच्या बनावट ओळखपत्राच्या आधारे लोकलमधून प्रवास करत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं अशा नागरिकांना पश्चिम रेल्वेनं सूचना केल्या आहेत. याबाबत पश्चिम रेल्वेनं आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन त्यांनी ट्विट केलं आहे.

'बनावट ओळखपत्राच्या आधारे प्रवास करणे हा दंडनीय अपराध आहे. त्याचबरोबर पश्चिम रेल्वेने नागरिकांना असं आवाहनही केलं आहे की, सध्या सुरु असलेल्या विशेष लोकल गाड्यांमधून केवळ महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनीच प्रवास करावा', असं या ट्विटमध्ये पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यानं राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. दुकाने, खासगी कार्यालयं तसंच इतर सुविधा खुल्या झाल्या असल्या तरी लोकल सेवा मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी अद्याप बंद आहे. ही सेवा सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठीच आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेचं बनावट ओळखपत्र बनवून लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्याचं या काळात दिसून आलं आहे.

एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, मध्य रेल्वेतही बनावट ओळखपत्राच्या आधारे किंवा तिकीटाशिवाय प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. गेल्या ४५-४६ दिवसात २,७२५ लोक बनावट ओळखपत्र वापरुन प्रवास करताना आढळले आहेत. आत्तापर्यंत रेल्वे प्रशासनाने १३ लाख ६५ हजार रुपयांचा दंड बनावट ओळखपत्र वापरणाऱ्यांकडून वसूल केला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा