सप्टेंबरपासून सीरम बनवणार स्पुतनिक व्ही

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) लवकरच रशियन लस स्पुतनिक-व्ही तयार करेल. सीरम सध्या देशात कोरोना लस कोव्हशील्डची निर्मिती करत आहे.

या प्रकरणात, रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) चे सीईओ किरिल दिमित्रीव्ह यांनी सांगितलं की, SII सप्टेंबरपासून स्पुतनिक -व्हीचे उत्पादन सुरू करेल. दरवर्षी तिथं ३० कोटी डोस तयार केले जातील. काही इतर उत्पादकदेखील भारतात ही लस तयार करण्यास तयार आहेत.

याआधी SII ने गेल्या महिन्यात स्पुतनिक-व्ही च्या उत्पादनाच्या चाचणी परवान्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडे परवानगी मागितली होती. यासह, SII नं चाचणी विश्लेषण आणि परीक्षेसाठी देखील अर्ज केला होता. SII ही देशातील स्पुतनिकची निर्मिती करणारी सहावी कंपनी आहे.

डॉ. रेड्डीजच्या प्रयोगशाळांमध्येही स्पुतनिक-व्हीची निर्मिती केली जात आहे. DCGI कडून आपत्कालीन वापरासाठी स्पुतनिक-व्हीला मान्यताही मिळाली आहे. या रशियन लसीचा वापर १४ मेपासून सुरू झाला होता. स्पुतनिक आता ५० हून अधिक देशांमध्ये रजिस्टर्ड आहे. एका अभ्यासानुसार, त्याचा इफेक्टिव्हनेस 97.6% आहे.

सीरम संस्थेच्या अदार पूनावाला यांनी कराराबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, स्पुतनिक लस तयार करण्यासाठी RDIF बरोबर झालेल्या करारामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. आगामी काळात आम्ही लक्षावधी लस तयार करण्यास तयार आहोत. कोरोनाला हरवण्यासाठी, जगातील सर्व देश आणि संस्था लसीकरणासाठी एकत्र आल्या पाहिजेत.


हेही वाचा

रशियातील स्पुटनिक व्ही लस मुंबईत दाखल

न्युमोकोकल आजारापासून संरक्षण देणाऱ्या पीसीव्ही लसीकरणाला नवी मुंबईत सुरूवात

पुढील बातमी
इतर बातम्या