मुंबईतील तीन कोविड सेंटर १ जूनपर्यंत बंद, नवीन रुग्णांना प्रवेश नाही

तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका मुंबईतील कोविड सेंटरला बसला आहे. त्यामुळे मुंबई महापालिका चालवत असलेली तीन कोविड सेंटर दुरूस्तीसाठी १ जूनपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. या कालावधीत नवीन रूग्णांना या कोविड सेंटरमध्ये प्रवेश दिला जाणार नाही

मुंबईसह आजूबाजूच्या परिसराचं तौक्ते चक्रीवादळामुळे मोठं नुकसान केले आहे. मुंबईतील जंबो कोविड सेंटरलाही याचा फटका बसला आहे. बीकेसी, मुलुंड आणि दहिसर येथील कोविड सेंटरचं चक्रीवादळात नुकसान झालं आहे. 

चक्रीवादळ मुंबईच्या किनारपट्टी जवळ येण्यापूर्वीच सेंटरमधील ५०० रूग्णांना इतरत्र हलवण्यात आले होते. कोविड सेंटरची दुरूस्ती करण्यासाठी तसंच पावसाचादेखील कोणताही परिणाम या सेंटरवर होऊ नये यासाठी १० दिवस सेंटर बंद ठेवण्यात येणार आहेत. या कालावधीत नवीन रूग्णांना या कोविड सेंटरमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती महापालिकेने दिली आहे.

बीकेसी, मुलुंड, दहीसर कोविड सेंटरमध्ये सध्या उपचार घेत असलेल्या नागरिकांना याचा कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. मात्र पुढील आदेश येत पर्यंत नवीन रूग्णांना या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही.



हेही वाचा -

मुंबईतील 'या' आठवड्याचं लसीकरण नियोजन जाहीर

दादर परिसरात टॅक्सी चालकाची हत्या

पुढील बातमी
इतर बातम्या