Coronavirus Updates: मुंबई, उल्हासनगरमध्ये आणखी 2 रुग्ण

कोरोना विषाणूचा फैलाव वाढत चालला आहे. कोरोनाची लागण झालेल्या राज्यातील रूग्णांची संख्या आता 47 झाली आहे. मुंबई आणि उल्हासनगरमध्ये कोरोनाचे आणखी 2 रुग्ण आढळले आहेत.  दोन्ही रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कोरोनाची लागण झालेली 49 वर्षीय महिला उल्हासनगरमध्ये राहते. ही महिला दुबईचा प्रवास करून आली आहे. विमानतळावर तपासणी केली असता तिला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यामुळे तिला विलगीकरण कक्षात ठेवलं आहे. याशिवाय मुंबईतील  २२ वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे.  ही तरुणी ब्रिटनमधून आली होती.तिच्यावरही विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. त्यामुळे आता राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४७ वर पोहोचली आहे. तर देशातील करोना रुग्णांची संख्या १७१ झाली आहे.

दरम्यान, मक्केला यात्रेसाठी गेलेले ३०३५ यात्रेकरू अडकून पडले होते. त्यातील अखेरच्या तुकडीला भारतात आणण्यात येत आहे.या तुकडीला आणणाऱ्या पहिल्या विमानाने जेद्दाहून उड्डाण घेतले होते. थोड्यावेळापूर्वीच हे विमान मुंबईत दाखल झाले आहे. विशेष विमानाने आलेल्या या सर्व प्रवाशांची कोरोना तपासणी होणार आहे. त्यांची चाचणी पाॅझिटिव्ह आल्यास त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार

आहे.


हेही वाचा -

Coronavirus Updates: पश्चिम रेल्वेची एसी लोकल बंद

Coronavirus : क्वारंटाईनचा सल्ला दुर्लक्षित करून चौघा तरूणांचा ट्रेनमधून प्रवास


पुढील बातमी
इतर बातम्या