डाॅक्टरांवर हल्ला केल्यास १० वर्षे तुरूंगवास?

कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांवर हल्ला केल्यास संबंधित दोषी व्यक्तीला १० वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १० लाख रुपये दंडापर्यंतची शिक्षा होऊ शकते.

आरोग्य मंत्रालयानं 'हेल्थकेअर सर्व्हिस पर्सनल अँड क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट (प्रोहिबिशन ऑफ व्हायलेन्स अँड डॅमेज ऑफ प्रॉपर्टी) विधेयक २०१९' चा मसुदा तयार केला असून, त्यावर ३० दिवसांच्या आत नागरिकांच्या सूचना, हरकती मागवल्या आहेत.

या विधेयकातील तरतुदींनुसार, डॉक्टर अथवा रुग्ण सेवकांना गंभीर इजा पोहोचवल्यास आणि त्यात दोषी आढळल्यास संबंधित आरोपीला किमान ३ वर्षे ते १० वर्षे तुरुंगवास किमान २ लाख रुपये ते कमाल १० लाख रुपयांपर्यंत दंडापर्यंत शिक्षा होऊ शकते. 

कर्मचाऱ्यांवरील वाढत्या हल्ल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकार नवा कायदा करणार आहे. डॉक्टरांवरील हल्ल्यासारखी हिंसक घटना गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा मानण्यात येईल, असा प्रस्ताव आहे.  

रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांवर हल्ले आणि रुग्णालयाच्या तोडफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदा करावा, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशननं सरकारकडे अनेकदा केली. त्यानुसार सरकारने हा कायद्याचा मसुदा बनवला आहे.


हेही वाचा-

दादरमध्ये २२ ठिकाणी ६१ 'नो पार्किंग' झोन

लोकलवरील दगडफेकीत ११३ प्रवासी जखमी


पुढील बातमी
इतर बातम्या