Advertisement

लोकलवरील दगडफेकीत ११३ प्रवासी जखमी

गेल्या साडेसहा वर्षांत मुंबई लोकलवर झालेल्या दगडफेकीच्या ११८ घटनांमध्ये ११३ प्रवासी जखमी झाले आहेत. ही धक्कादायक माहिती माहिती माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे.

लोकलवरील दगडफेकीत ११३ प्रवासी जखमी
SHARES

गेल्या साडेसहा वर्षांत मुंबई लोकलवर झालेल्या दगडफेकीच्या ११८ घटनांमध्ये ११३ प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी केवळ २१ प्रकरणं निकाली काढण्यात रेल्वे पोलिसांना यश आल्याची धक्कादायक माहिती माहिती माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे. 

केवळ २१ प्रकरणं निकाली

मागच्या काही महिन्यांमध्ये लोकलवरील दगडफेकीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर अशा किती घटना घडल्या, किती गुन्हे नोंदवले गेले आणि किती जणांना अटक करण्यात आली याची माहिती मी रेल्वे प्रशासनाकडे मागितली होती. त्यावर मिळालेली आकडेवारी धक्कादायक आहे. २०१३ ते जून २०१९ दरम्यान दगडफेकीच्या ११८ घटनांमध्ये ११३ प्रवासी जखमी झाले आहेत. तर गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसां (GRP)ना यापैकी केवळ २१ प्रकरणांचा तपास करण्यात यश मिळालं आहे, अशी माहिती शकील अहमद शेख यांनी दिली. 

वर्षघटनाजखमीतपास
२०१३१६१४०३
२०१४२१२००४
२०१५१६१६०१
२०१६१२०९०१
२०१७१५१९०४
२०१८२७२७०४
२०१९११०८०४


म. रेल्वेवर सर्वाधिक घटना

  • यापैकी दगडफेकीच्या बहुतेक घटना मध्य रेल्वे मार्गावर घडल्या आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील अशा ८४ घटनांमध्ये ८१ जण जखमी झाले आहेत. यापैकी १५ प्रकरणे निकाली काढण्यात जीआरपीला यश आलं असून १३ जणांना संशयीत म्हणून ताब्यात घेण्यात आलं. 
  • हार्बर मार्गावर पनवेल आणि वडाळा दरम्यान घडलेल्या २१ घटनांमध्ये १८ प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी जीआरपीने ५ प्रकरणे निकाली काढली असून ६ जणांना संशयीत म्हणून ताब्यात घेतलं आहे. 
  • तर, चर्चगेट ते पालघर दरम्यान दगडफेकीच्या १३ घटना घडल्या असून यांत १४ प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी केवळ १ प्रकरण निकाली लावण्यात जीआरपीला यश मिळालं आहे.


२००५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाने रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूंना संरक्षक भिंत उभारण्याचे निर्देश दिले होते. परंतु त्याचं काम अजूनही सुरू झालेलं नाही. अंमली पदार्थांचं सेवन करणारे, कचरा वेचणारे आणि झोपडपट्टीतील समाजकंटक, काही फेरिवाले आणि तृतीय पंथीयही दगडफेक करत असल्याचं दिसून आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. 

 


हेही वाचा-

कल्याण स्थानकात लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी वेगळे रेल्वे रुळ

रस्त्यांवरील खड्डे भरणं बेकायदेशीर- महापालिका



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा