मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकातून लोकल गाड्यांसह लांबपल्ल्याच्या गाड्या मोठ्या प्रमाणात सुटतात. मात्र, कल्याण स्थानकातून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यासाठी लोकल गाड्यांना कल्याण स्थानकात पोहोचण्यासाठी उशिर असल्यानं प्रवाशांचीही प्रचंड गैससोय होते. त्यामुळं ही सर्व बाब लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनानं कल्याण स्थानकातल लोकल आणि लांबपल्ल्याच्या गाड्यांसाठी वेगळे रेल्वे रुळ बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकल गाड्यांसाठी ४ रेल्वे रुळ बांधण्यात येणार असून, लांबपल्ल्यांच्या गाड्यांसाठी ६ रेल्वे रुळ बांधण्यात येणार आहेत. या कामासाठी ९६१ कोटी रुपये खर्च होणार असल्याचं मध्य रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. हे बांधकाम मुंबई शहर परिवहन प्रकल्प ३ए (एमयुटीपी) चा एक भाग आहे. तसंच, कल्याण स्थानकातील रेल्वे रुळाच्या बांधकामाच काम मध्य रेल्वेकडून टप्प्याटप्प्यानं करण्यात येणार आहे.
रेल्वे रुळांच्या बांधकामासह मध्य रेल्वे कल्याण स्थानकाच्या दक्षिण पूर्व भागात रेल्वे पूल बांधण्याच्या विचारात आहे. तसंच, एक रोड ओव्हरब्रिज बांधण्यात येणार असून हा ब्रिज पत्री पूलाच्या बाजूला बांधण्यात येणार आहे. दरम्यान, कल्याण स्थानकातून ७६० गाड्या ये-जा करतात. त्यामुळं लोकल आणि लांबपल्ल्यांच्या गाड्यांसाठी वेगळे रेल्वे रुळ बांधल्यास कल्याण स्थानकातील रेल्वे वाहतूक सुरळीत होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा -
गणेशोत्सव २०१९: भारत-पाकचा राजा, मुंबईतून झाला रवाना
गणेशोत्सव २०१९: एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला, पगार होणार लवकर