गणेशोत्सव २०१९: भारत-पाकचा राजा, मुंबईतून झाला रवाना

मुंबईसह देशभरात बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी केली जात असून अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये बाप्पा विराजमानही झाले. अशातच भारत-पाक बॉर्डरचा राजा काश्मीरसाठी रवाना झाला आहे

SHARE

मुंबईसह देशभरात बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी केली जात असून अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये बाप्पा विराजमानही झाले. अशातच भारत-पाक बॉर्डरचा राजा काश्मीरसाठी रवाना झाला आहे. हा बाप्पा भारत-पाक सीमेवर विराजमान होतो. दरम्यान, जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. मात्र, काश्मीरमधील गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी करत असून आतुर झाले आहेत

बाप्पा रेल्वेनं रवाना

जम्मू काश्मीरात तणाव असला तरी, गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. मुंबईतून सोमवारी काश्मीरसाठी हा बाप्पा रेल्वेनं रवाना झाला. काश्मीरमधील गणेशभक्त किरण ईशर यांनी मुंबईतून गणपती बाप्पांना घेऊन रवाना झालेत. किरण ईशर यांनी मुंबईतून गणपतीच्या ३ मुर्ती घेऊन जम्मू काश्मीरला रवाना झालेत. यात ६.५ फूटाची गणेश बाप्पाची मुर्तीचा समावेश आहे.

तणावाचं वातावरण

गणपतीच्या स्वागतावेळी मोठी रांगोळी काढण्यात आली होती. रांगोळीत भारताचा नकाशा बनवून त्यात भारत-पाक बॉर्डरचा राजा लिहिण्यात आलं होतं. दरम्यान, भारत-पाक यांच्यात तणावाचं वातावरण असल्यानं गणेशोत्सावाच्या माध्यमातून जवानांचं मनोबल वाढविण्यासाठी साजरा केलेला गणेशोत्सव निश्चित फायदेशीर ठरणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.हेही वाचा -

गणेशोत्सव २०१९: आर्थिक मंदीमुळं यंदा २५ टक्के मंडळ कमी

गणेशोत्सव २०१९: ऐन सणासुदीच्या काळात सुका मेव्याच्या किमतीत वाढसंबंधित विषय
ताज्या बातम्या