Advertisement

गणेशोत्सव २०१९: एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला, पगार होणार लवकर

एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचं वेतन ३१ ऑगस्टपर्यंत देण्यात येणार आहे.

गणेशोत्सव २०१९: एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला, पगार होणार लवकर
SHARES

एसटी महामंडळांतील कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एसटी महामंडळातील (Maharashtra State Road Transport Corporation) कर्मचाऱ्यांना गणेशोत्सव (Ganpati utsav 2019) मोठ्या उत्साहात साजरा करता यावा, यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचे वेतन ३१ ऑगस्टपर्यंत देण्यात येणार आहे. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांना (ST workers) मोठा दिलासा मिळणार आहे.

हक्काचं वेतन

एसटीमध्ये सुमारे १ लाख कर्मचारी असून त्यांचा पगार (Salary) दरमहा ७ तारखेला होते. मात्र, यंदा गणेशोत्सव २ सप्टेंबरला असल्यानं सणाच्या पूर्व तयारीसाठी कर्मचाऱ्यांच्या हातात त्यांच्या हक्काचं वेतन योग्य वेळी मिळणं आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेत एक आठवडा अगोदर कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या बँकेत (Bank) जमा होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री (Transport Minister) दिवाकर रावते (Diwakar Raote) यांनी दिली. 

नियमित तारखेच्या अगोदर

याआधी दिवाळी-ईद उत्सवापूर्वी संबंधित सणासुदीला कर्मचाऱ्यांचं वेतन नियमित तारखेच्या अगोदर देण्यात आलं आहे. दरम्यान, एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळं कर्मचाऱ्यांना गणपती बाप्पा पावला आहे.



हेही वाचा -

'या' मागण्यांसाठी महापालिका कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा

गणेशोत्सव २०१९: आर्थिक मंदीमुळं यंदा २५ टक्के मंडळ कमी



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा