Advertisement

'या' मागण्यांसाठी महापालिका कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा

बेस्ट कर्मचाऱ्यांनतर आता महापालिका कर्मचऱ्यांनीही संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

'या' मागण्यांसाठी महापालिका कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा
SHARES

बेस्ट (BEST) कर्मचाऱ्यांनतर आता महापालिका (BMC) कर्मचऱ्यांनीही संपावर (Strike) जाण्याचा इशारा दिला आहे. नवीन वेतन करार, सदोष बायोमेट्रिक हजेरी पद्धत बंद करणं, वैद्यकीय गटविमा योजना सुरू करणं आदी मागण्यांसाठी महापालिका कर्मचारीही आंदोलनाच्या तयारीत आहेत. या मागण्यांबाबत कामगार संघटनांची पालिका प्रशासनासोबत मंगळवारी बैठक होणार असून, बुधवारी मोर्चा काढण्यात येणार आहे.


आंदोलनाचा इशारा

या मोर्चानंतर वेतनवाढी संदर्भात निर्णय न झाल्यास गणेशोत्सवानंतर आंदोलनाचा इशारा कामगारांच्या समन्वय समितीने दिला आहे. महापालिका कामगार संघटनेच्या समन्वय समितीनं १२ जुलै २०१९ रोजी आपल्या विविध मागण्यांसाठी प्रशासनासह चर्चा केली होती. मात्र, त्यानंतर नवीन वेतन करारासह अन्य मागण्यांबाबत निर्णय झाला नाही.


या आहेत मागण्या

  • महापालिकेत कामगार कर्मचारी व अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. मात्र, सदोष यंत्रामुळं कामगारांची गैरहजेरी लागत असून त्यांचे वेतन कापलं जात असल्यानं ही हजेरी पद्धतीच बंद करावी.
  • सहाव्या वेतन आयोगानुसार कामगारांना लागू असलेली सामूहिक गटविमा योजना १ सप्टेंबर २०१९ पासून पुन्हा सुरू करावी.
  • सातव्या वेतन आयोगानुसार वेतनवाढीसह सर्व भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी वाटाघाटी समितीची स्थापना करावी.
  • १ जानेवारी २०१६ पासून सर्व थकबाकी गणेशोत्सवापूर्वी एकरकमी देण्यात यावी.
  • पालिकेच्या सेवेत ५ मे २००८ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या कामगार-कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावानं सुरू करण्यात यावी.



हेही वाचा -

१६ पुलांच्या दुरूस्तीसाठी पालिका करणार १४ कोटी रुपये खर्च

गणेशोत्सव २०१९: आर्थिक मंदीमुळं यंदा २५ टक्के मंडळ कमी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा