१६ पुलांच्या दुरूस्तीसाठी पालिका करणार १४ कोटी रुपये खर्च

डांबराच्या थरामुळं अवजड होऊ लागलेल्या पुलांच्या खांबांवरील भार कमी करण्यासाठी मुंबईतील १६ ठिकाणचे पूल खरवडण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे.

SHARE

डांबराच्या थरामुळं अवजड होऊ लागलेल्या पुलांच्या खांबांवरील भार कमी करण्यासाठी मुंबईतील १६ ठिकाणचे पूल खरवडण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. मागील अनेक वर्षांत पालिकेनं पुलांवरही डांबराचे व सिमेंट काँक्रीटचे थर टाकल्यानं पुलांवरील भार वाढत चालला आहे. त्यामुळं पूल कमकुवत होत असल्याची माहिती आयआयटीनं पालिकेला दिली. दरम्यान, मुंबई आयआयटीनं केलेल्या या शिफारशीनुसार पालिकेनं हा निर्णय घेतला आहे. तसंच, या कामासाठी पालिका साडेचौदा कोटी रुपये खर्च करणार आहे. स्थायी समितीच्या परवानगीनंतर हे काम नऊ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे.

मास्टिक अस्फाल्टचं थर

डांबराचे थर काढून टाकण्याची सूचना आयआयटीनं पालिकेला केली आहे. त्यानुसार, मुंबईतील एकूण १६ पूल खरवडून काढण्याचं पालिकेनं ठरवलं आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनानं तयार केला असून स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. त्यानुसार १६ पुलांवरील पृष्ठभाग खरवडून त्यावर नव्यानं मास्टिक अस्फाल्टचं थर चढवण्यासाठी पालिका तब्बल १४ कोटी ४० लाख रुपये खर्च करणार आहे.

हे पूर खरवडणार

महालक्ष्मी, प्रभादेवी (कॅरोल पूल), दादर (टिळक पूल), चिंचपोकळी (उत्तर दिशेकडील पूल), करी रोड (उत्तर दिशेकडील पूल), वडाळा (नाना फडणवीस पूल), जीटीबी, माटुंगा (टी. एच. कटारिया पूल), मुंबई सेंट्रल (बेलासिस पूल), भायखळा, ग्रँट रोड, गँट्र रोड-चर्नी रोडदरम्यानचा केनेडी पूल, डायना पूल, फ्रेंच पूल, मरिन लाइन्स (प्रिन्सेस स्ट्रीट), सँडहर्स्ट रोड हे पूल महापालिका खरवडणार आहे. हेही वाचा -

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मंगळवारी लागणार निकाल

गणेशोत्सव २०१९: आर्थिक मंदीमुळं यंदा २५ टक्के मंडळ कमीसंबंधित विषय
ताज्या बातम्या