Advertisement

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मंगळवारी लागणार निकाल

बेस्ट कर्मचाऱ्यांना नवीन वेतन करारा लागू करण्यासाठी कामगार संघटनांनी प्रशासनाला २ दिवसांची मुदत दिली. आपल्या विविध मागण्यांसाठी कामगारांनी वडाळा येथील बस आगाराबाहेर सोमवारी धरणे आंदोलन सुरु आहे

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मंगळवारी लागणार निकाल
SHARES

बेस्ट कर्मचाऱ्यांना नवीन वेतन करारा लागू करण्यासाठी कामगार संघटनांनी प्रशासनाला २ दिवसांची मुदत दिली. आपल्या विविध मागण्यांसाठी कामगारांनी वडाळा येथील बस आगाराबाहेर सोमवारी धरणे आंदोलन सुरु आहे. मात्र, मंगळवारपर्यंत कराराबाबत निर्णय न झाल्यास संपाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं बेस्ट कामगारांच्या कृती समितीनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, बेस्ट प्रशासनाकडून वेतन करारास विलंब होत असल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असून, या पार्श्वभूमीवर समितीच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून बेस्ट कामगारांच्या समस्येबाबत तोडगा काढण्याची विनंती केली आहे.


प्रलंबित वेतनकरार

बेस्ट कर्मचाऱ्यांचा एप्रिल २०१६ पासून प्रलंबित असलेला वेतनकरार तातडीनं करण्यात यावा, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, पालिका अर्थसंकल्पात बेस्ट अर्थसंकल्पाचे विलीनीकरण, पालिका कामगारांप्रमाणेच बोनस आदी प्रमुख मागण्यांसाठी कृती समिती आक्रमक आहे.

संपासाठी मतदान

बेस्ट प्रशासनातर्फे मंगळवारपर्यंत वेतनकरार जाहीर होण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. त्यातच, बेस्ट समितीची बैठकही मंगळवारी होणार आहे. त्यामुळं मंगळवारी दुपारी होणाऱ्या या बैठकीत काय निर्णय घेण्यात येईल त्यावर आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. प्रलंबित मागण्यांसाठी आतापर्यंत ३ वेळा संप पुढे ढकलण्यात आला आहे. गेल्या शुक्रवारी कृती समितीनॆ सर्व बस आगारांमध्ये मतदान घेतलं. त्यावेळी ९८ टक्के कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूनं कौल दिला.



हेही वाचा -

बँक घोटाळा: अजित पवार यांच्यासहीत बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल

गणेशोत्सव २०१९: मुंबई-कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा