Coronavirus cases in Maharashtra: 920Mumbai: 526Pune: 101Pimpri Chinchwad: 39Islampur Sangli: 25Kalyan-Dombivali: 23Ahmednagar: 23Navi Mumbai: 22Thane: 19Nagpur: 17Panvel: 11Aurangabad: 10Vasai-Virar: 8Latur: 8Satara: 5Buldhana: 5Yavatmal: 4Usmanabad: 3Ratnagiri: 2Kolhapur: 2Jalgoan: 2Nashik: 2Other State Resident in Maharashtra: 2Ulhasnagar: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Gondia: 1Palghar: 1Washim: 1Amaravati: 1Hingoli: 1Jalna: 1Total Deaths: 52Total Discharged: 66BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

गणेशोत्सव २०१९: मुंबई-कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी

गणेशोत्सवासाठी मुंबई - कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०१९ दरम्यान टोल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली.

गणेशोत्सव २०१९: मुंबई-कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी
SHARE

गणेशोत्सवासाठी मुंबई - कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०१९ दरम्यान टोल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रस्त्यांचा आढावा चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी घेतला. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, गृहनिर्माण राज्य मंत्री रवींद्र वायकर, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, रस्ते विभागाचे सचिव सी. पी. जोशी, सार्वजनिक बांधकाम इमारत विभागाचे सचिव अजित सगणे, राष्ट्रीय महामार्ग विभागचे अधिक्षक अभियंता विनय देशपांडे इ. उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, यंदा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली होती. गणेशोत्सव काळात प्रवाशांना त्रास सहन करावा लागू नये, म्हणून या रस्त्यांच्या डागडुजी कामे तात्काळ हाती घेण्यात आली आहेत. याचबरोबर मुंबई-कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे कामही जलदगतीने सुरु आहे. वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या रस्त्यावर आवश्यकतेनुसार, रोड स्ट्रीप्स, सूचना करणारे बोर्ड, गावांची नावे, जंक्शन बोर्ड, रॅम्बलर पट्टी, गतीरोधक लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचंही ते म्हणाले.हेही वाचा-

गणेशोत्सव २०१९ : स्वराज्याची मुहर्तमेढ रोवणारा गणेश गल्लीचा राजा

गणेशोत्सव २०१९: गणपती बाप्पाची मिरवणूक यंदा लांबणारसंबंधित विषय
संबंधित बातम्या