वेतन थकबाकीसाठी वाडिया रूग्णालयातील कर्मचाऱ्यांचं आंदोलन

गेल्या काही दिवसांपासून वेतनवाढ व अन्य काही मागण्यांसाठी विविध रूग्णालयातील कर्मचाारी संपावर जात अाहेत. बुधवारपासून परळच्या वाडिया रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी थकीत अनुदान त्वरीत देण्याच्या मागणीसाठी एकदिवसीय धरणं आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनात वाडिया रूग्णालयातील नर्स व इतर कर्मचारी सहभागी झाले आहेत. 

मागण्या काय?

वाडिया रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना १९५७ साली झालेल्या करारानुसार सेवा व सवलती प्रमाणं पगार दिला जातो. त्यानंतर सहावा वेतन अायोगही लागू करण्यात आला.  यानुसार ५० टक्के अनुदान पालिकेतर्फे तर इतर ५० टक्के अनुदान राज्य शासनाकडून देण्यात येते. मात्र २००६ सालापासून या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून हेनुदान देण्यात आलेलं नाही. ही रक्कम जवळपास ६७ कोटी ७७ लाख इतकी अाहे. ही रक्कम न मिळाल्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होत अाहे.  यामुळं राज्य शासनानं रूग्णालयाचं रखडलेलं अनुदान लवकरात लवकर द्यावं अशी मागणी करतलालबावटा जनरल कामगार युनियनच्यावतीनं आंदोलन करण्यात येतं आहे.

मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

लालबावटा जनरल कामगार युनियनच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली अाहे. मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लवकरात लवकर लक्ष घालू व थकलेली वेतनवाढ लवकरच रूग्णालय प्रशासनाला देण्यात येईलं असं आश्वासन दिलं आहे. 


हेही वाचा - 

हो, मॅगीत शिसं... आम्ही शिसं असलेली मॅगी खावी का? -सर्वोच्च न्यायालय


पुढील बातमी
इतर बातम्या