Advertisement

हो, मॅगीत शिसं... आम्ही शिसं असलेली मॅगी खावी का? -सर्वोच्च न्यायालय

मॅगी आरोग्यास घातक असल्याच्या तक्रारीवरून मॅगीविरोधात महाराष्ट्रासह देशभर कारवाई झालेली आहे. मॅगी जप्त करत नष्टही करण्यात आली आहे. तर मॅगीच्या नमुन्याच्या तपासणीत मॅगीमध्ये प्रमाणापेक्षा अतिरिक्त शिसं असल्याचंही अनेकदा समोर आलं आहे.

हो, मॅगीत शिसं... आम्ही शिसं असलेली मॅगी खावी का? -सर्वोच्च न्यायालय
SHARES

बस दो मिनिटं असं म्हणत लहानग्यांपासून वृद्धापर्यंत सर्वजण चवीचवीनं मॅगी खातात. पण हीच सर्वांच्या आवडीची मॅगी आरोग्यास घातक असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. पण आता मॅगी खरंच आरोग्यास घातक आहे, मॅगीत प्रमाणापेक्षा अधिक शिसं असतं हे स्पष्ट झालं आहे आणि याची स्पष्ट कबुली खुद्द मॅगी उत्पादक नेस्ले कंपनीनं दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात नेस्लेनं ही कबुली दिली अाहे. 

 या कबुलीनंतर सर्वोच्च न्यायालयानं नेस्लेला फटकारत आम्ही शिसं असलेली मॅगी खायची का असा सवाल केला आहे. शिसं असलेल्या मॅगीविरोधात, नेस्लेविरोधात पुढील कारवाई करण्यास राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगा (एनसीडीआरसी) ला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता मॅगी, नेस्ले अडचणीत येणार असून मॅगी बंद होण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.


कडक कारवाई नाही

मॅगी आरोग्यास घातक असल्याच्या तक्रारीवरून मॅगीविरोधात महाराष्ट्रासह देशभर कारवाई झालेली आहे. मॅगी जप्त करत नष्टही करण्यात आली आहे. तर मॅगीच्या नमुन्याच्या तपासणीत मॅगीमध्ये प्रमाणापेक्षा अतिरिक्त शिसं असल्याचंही अनेकदा समोर आलं आहे. तर अतिरिक्त शिस असल्यानं असं शिसं असलेली मॅगी खाणं आरोग्यास घातक असल्याचंही उघड झालं आहे. मात्र, तरीही मॅगीविरोधात म्हणावी तशी कडक कारवाई झालेली नाही. 


नेस्ले, मॅगी अडचणीत

 मॅगीमध्ये शिसं अतिरिक्त असल्याच्या एनसीडीआरसीच्या आरोपानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं. मॅगीविरोधातील याचिकेवरील सुनावणीदरम्यान नेस्ले कंपनीनं अतिरिक्त शिसं असल्याचा दावा अनेकदा फेटाळून लावला आहे. पण गुरूवारच्या सुनावणीत नेस्लेच्या वकिलांनी अचानक मॅगीत अतिरिक्त शिसं असल्याची स्पष्ट कबुली दिली आहे. त्यांच्या या कबुलीमुळं चांगलीच खळबळ उडाली असून आता नेस्ले कंपनी आणि मॅगी दोन्ही अडचणीत आल्या आहेत. शिसं असल्यानं एनसीडीआरसीनं मॅगीविरोधात पुढील कारवाई करावी असे आदेश गुरूवारी सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. तर नेस्ले कंपनीला चांगलंच फटकारलं आहे. 



हेही वाचा - 

पालिका रूग्णालयात प्रत्येक चाचणी अवघ्या १०० रूपयांत?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा