Advertisement

पालिका रूग्णालयात प्रत्येक चाचणी अवघ्या १०० रूपयांत?

मुंबई महापालिकेच्या रूग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या आजारांचे निदान व्हावे यासाठी करण्यात येणाऱ्या वैद्यकीय चाचण्या ‘आपली चिकित्सा’ योजनेंतर्गत माफक दरात करण्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केली होती.

पालिका रूग्णालयात प्रत्येक चाचणी अवघ्या १०० रूपयांत?
SHARES

विविध आजारांच्या निदानासाठी करण्यात येणाऱ्या वैद्यकीय चाचण्या आता मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये शंभर रूपयांत करण्यात येणार आहे. आपली चिकित्सा या योजनेतंर्गत १३९ प्रकारच्या मूलभूत आणि जटील वैद्यकीय चाचण्यांचा यात समावेश करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात स्थायी समितीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार असून त्यावर तातडीनं अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळं मुंबईकरांना नववर्षात १३९ चाचण्यांमधील प्रत्येक चाचणी अवघ्या १०० रूपयांत करता येणार आहे.


नामांकित प्रयोगशाळांची निवड

पालिकेची १९ रूग्णालये, १७५ दवाखाने आणि २७ प्रसुतिगृहांत ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार अाहे. यासाठी शहर आणि उपनगरातील थायरोकेअर आणि मेट्रोपोलिस या नामांकित प्रयोगशाळांची निवड करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत रक्त तपासणीसह अन्य विविध प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या करता येणार असून गरीब रुग्णांना यामुळं दिलासा मिळणार आहे. १३९ वैद्यकीय चाचण्यांमध्ये १०१ प्रकारच्या मूलभूत नमूना चाचण्यांसाठी प्रति चाचणी शंभर रूपये, तर ३८ प्रकारच्या अतिविशेष प्रगत नमुना चाचण्यांसाठी प्रति चाचणी २०० रूपये आकारण्यात येणार आहेत.


घोषणा दोन वर्षांपूर्वी 

मुंबई महापालिकेच्या रूग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या आजारांचे निदान व्हावे यासाठी करण्यात येणाऱ्या वैद्यकीय चाचण्या ‘आपली चिकित्सा’ योजनेंतर्गत माफक दरात करण्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केली होती. त्याशिवाय येत्या अर्थसंकल्पीय भाषणात याची घोषणा केल्यानंतर प्रत्यक्षात ही योजना २०१९ या वर्षात अमलात येणार आहे . परंतु महापालिका रूग्णालयात आपली चिकित्सा या योजनेतंर्गत होणाऱ्या वैद्यकीय चाचण्या पूर्णपणे नि:शुल्क करण्यात येणार होत्या. परंतु प्रशासनानं हा निर्णयात बदल करून त्यासाठी १०० ते २०० रूपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. 



हेही वाचा - 

निवासी डॉक्टरांना न्यू इअर गिफ्ट, स्टायपेंडमध्ये ५ हजारांची वाढ




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा