म्हाडाच्या एका घरामागे तब्बल २१६ अर्ज

म्हाडानं काही दिवसांपूर्वी मुंबईतील २१७ घरांची सोडत जाहीर केली होती. या सोडतीला नंतर मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळं या सोडतीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत २१७ घरांसाठी तब्बल ४६ हजार म्हणजे एका घरामागे तब्बल २१६ अर्ज दाखल झाले आहेत.

२४ मेपर्यंत मुदतवाढ

म्हाडानं जाहीर केलेल्या सोडतीला उत्तम प्रतिसाद मिळत असून ४६ हजार अर्जदारांपैकी २६ हजार अर्जदारांनी आपली अनामत रक्कमही जमा केली आहे. तसंच या सोडतीला २४ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्यानं अर्जदारांची संख्या लाखाच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोडतीला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अर्जदारांकडे आणखी संधी उपलब्ध आहे.

 यापूर्वी म्हाडानं अर्ज दाखल करण्यासाठी १३ एप्रिल ही अंतिम तारीख असल्याचं स्पष्ट केलं होतं. तसंच २३ एप्रिल रोजी या घरांची सोडत निघणार होती. परंतु लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे याला मुदतवाढ देण्यात आली आहे.


हेही वाचा -

मध्य रेल्वेच्या परळ टर्मिनसहून सुटणार लांब पल्ल्याच्या गाड्या

लोअर परळ स्थानकाबाहेर चेंगराचेंगरी, एक महिला जखमी


पुढील बातमी
इतर बातम्या