Advertisement

लोअर परळ स्थानकाबाहेर चेंगराचेंगरी, एक महिला जखमी

पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ रेल्वे स्थानकाबाहेर चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.

लोअर परळ स्थानकाबाहेर चेंगराचेंगरी, एक महिला जखमी
SHARES

पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ रेल्वे स्थानकाबाहेर चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. दुरुस्तीच्या कामासाठी लोअर परळचा पूल बंद करण्यात आला आहे. त्यामुळं प्रवाशांना स्थानकाबाहेरील अरुंद रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. मात्रया रस्त्यावर महापालिकेचा ट्रक आल्यानं प्रवाशांची कोंडी झाली होती.


प्रवाशांची वर्दळ

मागील वर्षभर लोअर परळचा पूल दुरूस्तीसाठी बंद आहे. त्यामुळं प्रवाशांना स्थानकाबाहेरील अरुंद रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. लोअर परळ येथे अनेक मोठ्या कंपन्या असल्यामुळं प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. दरम्यान, सोमवारी संध्याकाळी प्रवासी कमावरून घरी जात होते. त्यावेळी या रस्त्यावर महापालिकेचा फेरीवाला हटवण्यासाठी आलेल्या ट्रकमुळं प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तसंच चेंगराचेंगरीचं वातावरण निर्माण झालं होतं.


ट्रक चालकाला मारहाण

चेगराचेंगरी होऊन कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रवासी गर्दीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी या रस्त्यावर असलेल्या एका वडापावच्या गाडीवरील तेलाची कढई खाली पडली. त्यामुळं एका मुलीचे दोन्ही पाय भाजले. या दुर्देवी घटनेनंतर संतप्त प्रवाशांनी पालिकेच्या ट्रक चालकाला मारहाण केली. तसंच, ट्रकची तोडफोड देखील केली.


प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, तणावपूर्ण परीस्थिती शांत केली. मात्र, लोअर परळच्या पुलाच्या दुरुस्तीचं काम रेल्वे आणि पालिका प्रशासन वेळेत करत नसल्यामुळं प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं.



हेही वाचा -

दुसऱ्या टप्प्यात राज ठाकरेंच्या ४ सभा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा