Advertisement

दुसऱ्या टप्प्यात राज ठाकरेंच्या ४ सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांची पोलखोल करण्यासाठी राज ठाकरे आपल्या सभेत जुने व्हिडिओ दाखवत आहेत. 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत राज मोदींच्या भाषणांचा समाचार घेत आहेत.

दुसऱ्या टप्प्यात राज ठाकरेंच्या ४ सभा
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुसऱ्या टप्प्यात राज्यभरात चार सभा घेणार आहेत. राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात राज्यभरात जाहीर सभांचा धडाका लावला आहे. त्यांच्या सभांनी भाजपा नेत्यांना धडकी भरली असून आता दुसऱ्या टप्प्यातील त्यांच्या सभांकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


सभांची वेळ सायंकाळी 

राज यांची दुसऱ्या टप्प्यातील पहिली सभा मंगळवारी मुंबईत अभ्युदयनगर-काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानावर होणार आहे. दुसरी सभा बुधवार, २४ एप्रिल रोजी भांडुपमधील जंगल मंगल रोडवर होणार आहे. तिसरी सभा कामोठे (गणेश मैदान, खांदेश्वर स्टेशनजवळ) येथे २५ एप्रिल रोजी तर चौथी सभा शुक्रवार २६ एप्रिल रोजी नाशिकमधील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणार आहे. या चारही सभांची वेळ सायंकाळी असणार आहे. 


राज यांचा धसका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांची पोलखोल करण्यासाठी राज ठाकरे आपल्या सभेत जुने व्हिडिओ दाखवत आहेत. 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत राज मोदींच्या भाषणांचा समाचार घेत आहेत.  त्यामुळे भाजप-शिवसेना युतीने राज यांच्या सभांचा चांगलाच धसका घेतला असून दुसऱ्या टप्प्यात राज यांच्या सभेत कोणते नवे व्हिडिओ झळकतात, याकडे लक्ष लागलं आहे. 



हेही वाचा  - 

चौकीदार Weds थापाबाई; मनसेकडून लग्नसोहळ्याचं निमंत्रण




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा