सिडकोची नववर्षाची भेट : १४ फेब्रुवारीला फुटणार ११०० घरांची लाॅटरी

नवी मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करू पाहणाऱ्यांसाठी सिडकोनं नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी भेट दिली आहे. तळोजा, घणसोली, कळंबोली, द्रोणागिरी आणि खारघर येथील ११०० घरांसाठी सिडकोने १ जानेवारी, मंगळवारपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीला सुरूवात केली आहे. त्यानुसार ३१ जानेवारीपर्यंत अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू राहणार असून १४ फेब्रुवारीला सिडको भवन इथं लाॅटरी फुटणार असल्याची माहिती सिडकोतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. तेव्हा नववर्षात हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईकर-नवी मुंबईकरांनो सज्ज व्हा.

अाधी शून्य प्रतिसाद 

२ आॅक्टोबरला सिडकोने तळोजा, द्रोणागिरी, कळंबोली, खारघर आणि घणसोली येथील अत्यल्प आणि अल्प १४ हजार ८३८ घरांसाठी लाॅटरी काढली होती. या लाॅटरीतील ११०० घरांसाठी शून्य प्रतिसाद आला नि ही घरं धूळखात पडून राहिली. त्यामुळे सिडकोच्या नव्या ठरावानुसार या घरांसाठी स्वतंत्र लाॅटरी काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला. त्यानुसार या ११०० घरांसाठी १४ फेब्रुवारीला लाॅटरी फोडण्यात येणार आहे. 

सर्वसामान्य गटासाठी घरं

महत्त्वाचं म्हणजे शिल्लक राहिलेली ही घरं पत्रकार, सिडको कर्मचारी, प्रकल्पग्रस्त अशा राखीव गटातील होते. पण सिडकोच्या नव्या ठरावानुसार ही सर्वच्या सर्व ११०० घरं सर्वसामान्य गटा (जनरल पब्लिक) साठी वर्ग करत याच गटासाठी लाॅटरी काढण्यात आली आहे. त्यामुळे या घरांमध्ये कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही. सिडकोच्या जानेवारी २०१९ मधील सर्वच्या सर्व ११०० घरांची लाॅटरी ही सर्वसामान्यांसाठी असेल असं वृत्त सर्वप्रथम 'मुंबई लाइव्ह'ने दिलं होतं. हे वृत्त अखेर तंतोतंत खरं ठरलं आहे.

८१६ अर्ज

या घरांसाठी १ जानेवारीला दुपारी साडेबारा वाजता नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीला सुरूवात झाली आहे. तर पहिल्याच दिवशी संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत ८१६ जणांनी अर्जही भरले आहेत. तर ६७ जणांनी अनामत रक्कमेसह अर्जही सादर केले आहेत. त्यामुळे या लाॅटरीलाही चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता अाहे. 

आवास योजनेत नोंदणी हवी

सिडकोच्या लाॅटरीतील अत्यल्प गटातील घरं ही पंतप्रधान आवास योजनेतील आहेत. त्यामुळे या घरांसाठी पंतप्रधान आवास योजनेत नोंदणी केलेली असणं गरजेचं आहे. तर नोंदणी नसेल तर इच्छुकांना त्वरीत नोंदणी करणंही गरजेचं असणार आहे. त्यानुसार इच्छुकांनी त्वरीत पंतप्रधान आवास योजनेत नोंदणी करावी आणि हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करावं असं आव्हान सिडकोकडून करण्यात आलं आहे.

पुन्हा नोंदणीची गरज नाही

याआधीच्या २ आॅक्टोबरच्या लाॅटरीत नोंदणी केलेल्या आणि अयशस्वी ठरलेल्या अर्जदारांना नव्याने नोंदणी करण्याची गरज नाही. जुन्याच नोंदणीवर केवळ नव्याने अर्ज भरत अनामत रक्कमेसह अर्जस्वीकृती करावी लागणार आहे. त्यामुळे यंदा अर्ज भरण्याची प्रक्रियाही सोपी असणार आहे. तर अनामत रक्कम अत्यल्प गटासाठी ५ हजार रुपये इतकी असून अल्प गटासाठी २५ हजार रुपये इतकी आहे. इतर शुल्क २८० रुपये असणार आहे. 

अर्ज प्रक्रिया

नोंदणी   -   १ जानेवारी दुपारी १२.३० पासून ३१ जानेवारी रात्री ११.५९ पर्यंत

अर्जविक्री -    १ जानेवारी दुपारी १२.३० पासून ३१ जानेवारी रात्री ११.५९ पर्यंत

अनामत रकमेसह अर्जस्वीकृती - १ जानेवारी दुपारी १२.३० पासून ३१ जानेवारी रात्री ११.५९ पर्यंत

आॅनलाईन पेमेंटद्वारे अर्जस्वीकृती -  १ जानेवारी दुपारी १२.३० पासून १ फेब्रुवारी  रात्री ११.५९ पर्यंत 

अत्यल्प गट

ठिकाण   घरं       किंमत (रूपयांमध्ये) 
तळोजा सेक्टर २२      २०         १८ लाख ३ हजार ८०० रुपये
तळोजा सेक्टर २९        १९     

१८ लाख ३ हजार ८००

द्रोणागिरी-भुखंड क्र. १, सेक्टर ११    १११८ लाख ४२ हजार ५००
द्रोणागिरी-भुखंड क्र. ६३ सेक्टर १२

 ११ 

१८ लाख ४२ हजार ५००
द्रोणागिरी-भुखंड क्र. ६८ सेक्टर १२१२

१८ लाख ४२ हजार  ५००

अल्प गट

ठिकाण   

घरं 

किंमत (रूपयांमध्ये) 

तळोजा सेक्टर २७

 २२४

 २५ लाख ८५ हजार ७००

तळोजा सेक्टर २१

१३४२५ लाख ४० हजार ६००

तळोजा सेक्टर २२

१४१२५ लाख ४० हजार ६००

तळोजा सेक्टर २९

१५१

२५ लाख ४० हजार ६००

 खारघर सेक्टर ४०

५९२६ लाख ३५ हजार २००

कळंबोली सेक्टर १५

५३२६ लाख ०१ हजार ८००

 घणसोली भुखंड क्र. १ सेक्टर १०

०८ २५ लाख ३८ हजार ९००

 घणसोली भुखंड क्र. २ सेक्टर १०

३५२५ लाख ५० हजार ०००

 द्रोणागिरी-भुखंड क्र. १ सेक्टर ११८१२५ लाख ६ हजार ७००

 द्रोणागिरी-भुखंड क्र. ६३ सेक्टर १२

६८२५ लाख ६ हजार ७००

द्रोणागिरी-भुखंड क्र. ६८ सेक्टर १२

७३२५ लाख ६ हजार,७००


हेही वाचा - 

सिडको लाॅटरी : सर्वच्या सर्व ११०० घरं सर्वसाधारण गटासाठीच


पुढील बातमी
इतर बातम्या