परळ टीटी इथला ब्रिज पालिका पाडणार, वाहतुकीसाठी होणार लवकरच बंद

(File Image)
(File Image)

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) दादरजवळील बाबासाहेब आंबेडकर रोडवरील परळ टीटी येथील उड्डाणपूल पाडून पुनर्बांधणी करण्याच्या तयारीत आहे.

पुढील वर्षी पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण व्हावे, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे हा पूल येत्या एक महिन्यात बंद होण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की यामुळे मुंबईकरांच्या वाहतूक कोंडीत भर पडू शकते. कारण या आठवड्याच्या सुरुवातीला पालिकेने अंधेरीतील गोखले पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. कारण तो असुरक्षित आणि धोकादायक असल्याचे आढळून आले होते, कारण त्याचे गर्डर वाकले होते.

पालिकेने ऑक्टोबरमध्ये प्रकल्पासाठी कार्यादेश जारी केले होते आणि आता ना-हरकत प्रमाणपत्राची प्रतीक्षा आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यास पूल पाडण्याचे काम सुरू होईल. साधारण पुनर्बांधणी करून पूल तयार होण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागेल.

परळ टीटी येथील उड्डाणपूल दुचाकी वाहनचालकांसाठी असुरक्षित मानला गेला आहे. कारण त्यावर जॉईट्स संख्या जास्त आहे. सध्या या पुलावर 32 जॉईंट्स आहेत. त्याच्या पुनर्बांधणीसह, पालिकेने हे जॉईट्स ३२ वरून ४ वर आण्याचा प्रयत्न करणार आहे.

सध्या पालिका वाहतूक पोलिसांकडून मिळणाऱ्या एनओसीच्या प्रतीक्षेत आहे. पण असं असलं तरी पालिकेने दुचाकी वाहनचालकांनी पूलाचा त्याचा वापर करू नये, असे फलक लावले आहेत.


हेही वाचा

बीकेसी ते एलबीएसला जोडणारा उड्डाणपूल सप्टेंबर 2023 पासून सुरू होणार

चर्नी रोडचा नवीन रेल्वे ब्रिज प्रवाशांसाठी खुला

पुढील बातमी
इतर बातम्या