मेट्रो ७, मेट्रो २ अ या मार्गांवरील सुरक्षाव्यवस्थेसाठी एमएमआरडीएकडून खासगी कंत्राटदारांची नियुक्ती

मुंबईतील अंधेरी ते दहिसर (मेट्रो ७) आणि दहिसर ते डी. एन. नगर (मेट्रो २ अ) या २ मार्गांवरील प्रवासी सेवा मे २०२१ पर्यंत सुरू करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. त्यानुसार या मार्गिकांच्या संचलनासाठी आवश्यक नियोजन सुरू करण्यात आले आहे. नुकताच या २ मेट्रो मार्गांवरील सुरक्षाव्यवस्थेसाठी एमएमआरडीएनं खासगी कंत्राटदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.

या मार्गांवरील सुरक्षा व्यवस्थेसाठी एमएमआरडीएने निविदा प्रसिद्ध केल्या असून तीन ३ वर्षांसाठी साधारणतः ३० कोटी ९८ लाख रुपये सुरक्षा व्यवस्थेवर खर्च करावे लागतील, असे अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकल्पांमध्ये निवृत्त लष्करी अधिकारी, होमगार्ड यांना किंवा किमान २ वर्षे सुरक्षा रक्षकाचं काम केल्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जणार आहे. त्यासाठी एमएमआरडीएनं शारीरिक निकषही निश्चित केले आहेत. 

'अशी' असणार व्यवस्था

  • ३० रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेसाठी ९ पर्यवेक्षक आणि १६३ गार्ड नेमले जाणार आहेत. 
  • ३० श्वान, त्यांचं ३० हँण्डलर्स आणि ४ पर्यवेक्षकांची नियुक्ती कंत्राटदाराला करावी लागणार आहे. 
  • श्वानांच्या वास्तव्यासाठी एमएमआरडीए जागा उपलब्ध करून देणार आहे. 
  • १३४ गार्ड आणि ६ सुपरवायझर कायम सुरक्षेसाठी तैनात ठेवावे लागणार आहे. 
  • सकाळी ५ ते रात्री १२ या त्यांच्या कामाच्या वेळा असणार आहे. 
  • प्रत्येकाला दररोज ९.३० तास काम आणि आठवड्यातून २ सुट्ट्या दिल्या जाणार आहेत. 
  • प्रत्येक स्थानकावर १ महिला गार्डही तैनात असेल. 
  • चारकोप डेपोच्या सुरक्षेची जबाबदारी २९ गार्ड आणि ३ पर्यपेक्षकांवर असेल. 
  • या मार्गांवरील ३० स्थानक आणि एका कारडेपोच्या सुरक्षेसाठी दररोज सुमारे २ लाख ७५ हजार रुपये खर्च होतील.


हेही वाचा -

G South पालिकेच्या कार्यालयात 'अशी' घेतली जातेय कर्मचाऱ्यांची काळजी

३० मिनिटात कोरोनाचं निदान, पालिकेचं 'मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग'


पुढील बातमी
इतर बातम्या