घराचं स्वप्न पूर्ण होणार, म्हाडा बांधणार १५ हजार ७८१ घरं

घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या वर्षभरात १५ हजार ७८१ घरे बांधण्याचे म्हाडाचे नियोजन आहे. त्यापैकी मुंबईत ४ हजार ६२३ घरे बांधण्यात येणार आहेत.

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि कोकणात म्हाडाची घरे बांधली जाणार आहेत. प्राधिकरणाने म्हाडाच्या २०२२-२३3 या वर्षासाठीच्या १०,७६४ कोटी रुपयांच्या बजेटला मंजुरी दिली आहे.

म्हाडा कोणत्या विभागात किती घरे बांधणार?

  • मुंबई - ४,६२३ फ्लॅट्स
  • BDD भूखंडांची पुनर्विकास योजना - रु २१३२.३४ कोटी
  • अँटॉप हिल वडाळ्यातील योजना - २९ कोटी रु
  • बॉम्बे डाईंग मिल वडाळा योजना - ६४ कोटी रु
  • कोपरी पवईतील योजना - रु. १४५.५४ कोटी
  • मागाठाणे बोरिवलीतील योजना - ५० कोटी रुपये
  • खडकपाडा दिंडोशीतील योजना - १५ कोटी रु
  • पहाडी गोरेगावमधील योजना - २५० कोटी
  • कोकण मंडळ - ७ हजार ५९२ सदनिका
  • वर्तक नगर इथली पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासासाठी २०० कोटींची तरतूद
  • पुणे - १,२५३ फ्लॅट्स
  • धानोरीतील भूसंपादन आणि भूविकासासाठी ३८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • नागपूर विभागात १९५ घरे बांधण्यात येणार आहेत.
  • औरंगाबाद विभागाला १ हजार ७६२ घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे.
  • नाशिक विभागात २२० आणि अमरावती विभागात १३६ घरे बांधण्याचे प्रस्तावित आहे.


हेही वाचा

भिवंडीतील मेट्रो ५चा मार्ग भूमिगत होणार

म्हाडाकडून लवकरच निघणार 'इतक्या' घरांसाठी सोडत

पुढील बातमी
इतर बातम्या