Advertisement

म्हाडाकडून लवकरच निघणार 'इतक्या' घरांसाठी सोडत

मुंबईजवळ घर खरेदी करण्याची संधी म्हाडाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील महिन्यात म्हाडाकडून १२०० घरांसाठी सोडत निघणार आहे.

म्हाडाकडून लवकरच निघणार 'इतक्या' घरांसाठी सोडत
SHARES

मुंबईजवळ घर खरेदी करण्याची संधी म्हाडाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील महिन्यात म्हाडाकडून १२०० घरांसाठी सोडत निघणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ही सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे ही घरे मुंबईजवळील शहरांमध्ये असणार आहे. या इमारतींचे बांधकाम खासगी विकासकांकडून करण्यात आले आहे.

म्हाडाच्या या सोडतीमधील घरे ही ठाणे, नवी मुंबई कल्याण-डोंबिविली, वसई-विरार या महापालिका हद्दीतील आहेत. ही घरे २० टक्के योजनेतील असणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने मागील वर्षी १४ ऑक्टोबर रोजी ८ हजार ९८४ घरांसाठी सोडत काढली होती.

म्हाडाच्या या सोडतीला चांगला प्रतिसाद लाभल्याने मोठ्या प्रमाणावर अर्ज आले होते. त्याची सोडतही काढण्यात आली होती. सध्या या सोडतीमधील विजेत्यांना घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्य सरकारने आर्थिक दुर्बल घटकांसाठी परवडणारी घरे देण्यासाठी २० टक्के योजना सुरू केली आहे.

या योजनेनुसार १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिका क्षेत्रात ४००० चौमी व त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळात बांधकाम होणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पातील २० टक्के घरे राखीव ठेवण्यात आली आहे. ही राखीव घरे म्हाडाला देण्यात येतात. ही घरे आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असतात.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा