नवी मुंबई: लॉजिस्टिक्स पार्कसाठी EOI आमंत्रित

भारताच्या झपाट्याने वाढणाऱ्या लॉजिस्टिक्स क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर, City and Industrial Development Corporation (सिडको) ने नवी मुंबईत मोठ्या इंटिग्रेटेड लॉजिस्टिक्स पार्क (ILP) उभारण्याची योजना सुरू केली आहे. यामुळे नवी मुंबई देशातील महत्त्वाचे लॉजिस्टिक्स हब म्हणून विकसित होण्याची शक्यता आहे.

हा प्रकल्प चिर्ले (Chirle) गावाजवळील पुष्पक नोडमध्ये सुमारे 374 हेक्टर क्षेत्रावर उभारला जाणार आहे. या ठिकाणाचे महत्त्व असे की, ते जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (Jawaharlal Nehru Port Authority) येऊ घातलेल्या Navi Mumbai International Airport आणि Mumbai Trans Harbour Link (अटल सेतू) यांच्याजवळ आहे.

सिडकोने या प्रकल्पासाठी सविस्तर मास्टर प्लॅन तयार केला आहे. संपूर्ण क्षेत्र 7 लॉजिस्टिक्स झोनमध्ये विभागले जाणार आहे. तसेच, 45 मीटर आणि 30 मीटर रुंदीच्या रस्त्यांचे जाळे उभारून वाहतुकीची सुलभता सुनिश्चित केली जाणार आहे. हा प्रकल्प राज्य सरकारच्या MIDC पास-थ्रू धोरणाशी सुसंगत आहे.

पहिल्या टप्प्यात, सिडकोने Land Parcel L1 मधील 12 प्लॉट्ससाठी (सुमारे 72 हेक्टर) इच्छुक कंपन्यांकडून EOI (Expression of Interest) मागवले आहेत. या ठिकाणी रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था आणि पावसाच्या पाण्याचा निचरा यांसारखी मूलभूत पायाभूत सुविधा सिडकोकडून उभारली जाणार आहे.

निवडलेल्या कंपन्यांना सिडकोसोबत करार करून विकासकामे करावी लागतील. या ILP मध्ये वेयरहाऊसिंग, कंटेनर फ्रेट स्टेशन, इनलँड कंटेनर डेपो आणि हलके उद्योग यांसारख्या विविध लॉजिस्टिक्स संबंधित सुविधा असतील.

अधिकाऱ्यांच्या मते, हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करेल. माल वाहतुकीची प्रक्रिया सुलभ करेल आणि नवी मुंबईला राष्ट्रीय स्तरावरील लॉजिस्टिक्स हब म्हणून मजबूत करेल.

याशिवाय, सिडको Educity, Medicity आणि Sportscity सारखे सामाजिक पायाभूत प्रकल्पही राबवत आहे, ज्यामुळे या भागाचा सर्वांगीण विकास होणार आहे.


हेही वाचा

2006 मालेगाव स्फोट प्रकरणात 4 आरोपींना दिलासा

पुढील बातमी
इतर बातम्या