वंदे भारत मेट्रो डिसेंबरपर्यंत तयार होईल

देशात लवतरच वंदे भारत मेट्रो धावणार आहे. प्रवाशांना लवकरच वंदे भारत मेट्रोने प्रवास करण्याची संधी मिळू शकते. याबाबत रेल्वेमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

वंदे मेट्रो ट्रेनची रचना वंदे भारत ट्रेनपेक्षा वेगळी असेल, असे रेल्वेमंत्र्यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले.

100 किमी पेक्षा कमी अंतर असलेल्या शहरांमध्ये ती धावेल. ही मेट्रो ट्रेन दोन्ही शहरांमध्ये ४ ते ५ फेऱ्या करणार आहे. वंदे मेट्रो ट्रेन डिसेंबरपर्यंत तयार होईल, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

ही ट्रेन मेट्रो शहराच्या आसपासच्या शहरांना जोडेल. 

वंदे मेट्रो ट्रेन मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई सारख्या महानगरांना जवळच्या लहान शहरे आणि क्षेत्रांशी जोडण्यासाठी काम करेल. सध्या रेल्वे मंत्रालयानेही यावर विचार सुरू केला आहे.


हेही वाचा

गोरेगाव : त्यांच्या मृत्यूने संतोष नगर परिसर हादरला, कुटुंबासाठी ठरला काळादिवस

पुढील बातमी
इतर बातम्या