महाराष्ट्रातील 'या' १० रेल्वे स्थानकांवर सुरू होणार ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) इथं सुरू झालेल्या शहरातील पहिल्या ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच येत्या काळात तुम्हाला आणखी अशा प्रकारची रेस्टॉरंट सुरू होणार आहेत. रेल्वे आता राज्यात अशी आणखी १० रेस्टॉरंट सुरू करण्याचा विचार करत आहे.

येत्या काही दिवसांत मुंबईला लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) आणि कल्याण इथं आणखी दोन ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ सुरू होऊ शकतात.

“रेस्टॉरंटला लोकांचा प्रतिसाद जबरदस्त आहे. काही लोक प्रतीक्षा करतात आणि मोठ्या गटांसाठी प्री-बुकिंग देखील करतात. आम्ही लवकरच इतर रेल्वे स्थानकांवर रेस्टॉरंट सुरू करणार आहोत,” असं मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.

मध्य रेल्वे (CR) नुसार, दररोज सरासरी ५०० लोकं रेस्टॉरंटला भेट देतात. त्यापैकी १०० लोक रेस्टॉरंटच्या बाहेर रांगा लावून थांबतात. यामुळे CR नं महाराष्ट्रातील नेरळ, इगतपुरी, लोणावळा, नागपूर, मिरज, चिंचवड, बारामती आणि आकुर्डी स्थानकावर आणखी आठ ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ सुरू करण्याची योजना आखली आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

सीएसएमटी इथल्या रेस्टॉरंटचे १८ ऑक्टोबर रोजी उद्घाटन झाल्याच्या दिवसापासून जवळपास १० हजार लोकांनी भेट दिली आहे. या रेस्टॉरंटमध्ये १० टेबल्स असून यात ४० जण बसून इथल्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात.


हेही वाचा

मुंबईत 'इथं' मिळतो बाहुबली मोमो, २ किलोच्या मोमजची किंमत...

पुढील बातमी
इतर बातम्या