Advertisement

मुंबईत 'इथं' मिळतो बाहुबली मोमो, २ किलोच्या मोमजची किंमत...

मोमोजच्या चाहत्यांसाठीच मुंबईतील एका हॉटेलनं चक्क बाहुबली मोमो खवय्यांसाठी सादर केला आहे.

मुंबईत 'इथं' मिळतो बाहुबली मोमो, २ किलोच्या मोमजची किंमत...
SHARES

दिसायला नक्षीदार, पाहताच क्षणी भूक चाळवणारा, पचायला हलका आणि खिशालाही परवडणारा. जर्मनच्या मोठ्या भांड्यात तयार केला जाणारा हा पदार्थ म्हणजे मोमोज. मोमो हा प्रकार अनेकांच्या आवडिचा.

मोमोजच्या चाहत्यांसाठीच मुंबईतील एका हॉटेलनं चक्क बाहुबली मोमो खवय्यांसाठी सादर केला आहे. मुंबईतील मेसी अड्डा इथं बाहुबली गोल्ड मोमो खवय्यांना चाखता येणार आहे.

बरं साधारण मोमोच्या एका प्लेटमध्ये ६ ते ८ मोमोज दिले जातात. पण बाहुबली मोमो त्याच्या अगदी नावाप्रमाणे आहे. एकच आहे पण तो दोघांसाठी पुरेसा आहे, असं म्हटलं तरी चालेल. मोठा आणि २ किलो वजनाचा असा हा मोमो आहे.

एका फूड ब्लॉगरनं याचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. शेअर करताच या व्हिडिओला अनेकांनी पसंती दिली.

एका मोठ्या बोलमधून हा मोमो सर्व्ह केला जातो. बोल उघडल्यावर मोमोजचं दर्शन होण्याआधी त्यातून स्मोक बाहेर येताना दिसेल. विशेष म्हणजे त्यावर २४ कॅरेट सोन्याचा वर्ख लावलेला आहे.


वेगवेगळ्या भाज्या आणि मोजरेला चीजनं भरलेल्या मोमोसोबत ऑरेंज मिंट मोजीटो सोबत, चॉकलेट मोमोज आणि चटणी आणि सॉसही दिले जातात. आता या संपूर्ण डिशची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. संपूर्ण दिशची किंमत १ हजार २९९ रुपये आहे.    

मोमोजचा हा हटके प्रकार नक्की ट्राय करा... आणि तुम्हाला हा मोमोज आवडला की नाही हे नक्की सांगा...
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा