मुंबईतल्या पेटिंग सेंटरमध्ये कुत्र्यांसोबत घालवा वेळ

तुम्हाला कुत्रा पाळायला किंवा त्याच्यासोबत वेळ घालवायला आवडतं? पण काही कारणास्तव तुम्हाला कुत्रा पाळणं शक्य नाही. कारण घरचे तयार नाहीत आणि तुमच्याकडेही तेवढा वेळ नाही. मग अशा परिस्थितीत तुमच्यासाठीच ही नवीन सेवा सुरू झाली आहे.

डॉग लव्हर फॉरेव्हर

डॉग लव्हरसाठी अंधेरीत एक डॉग पेटिंग सेंटर सुरु करण्यात आले आहे. 'पॉफेक्ट लाइफ' असं या डॉग पेटिंग सेंटरचं नाव आहे. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की, या सेंटरमधील कुत्र्यांसोबत तुम्हाला काही वेळ घालवायचा आहे. वेगवेगळ्या जातीच्या कुत्र्यांसोबत तुम्हाला वेळ घालवता येणार आहे.

तुम्हाला इथल्या कुत्र्यांसोबत वेळ घालवायचा असेल तर दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या दरम्यान या सेंटरला भेट देऊ शकता. तुम्हाला पाहिजे तर त्यांना तुम्ही खायला घालू शकता किंवा फिरायला बाहेर घेऊन जाऊ शकता. एका तासासाठी तुम्हाला २०० रुपये मोजावे लागतील.

कुठे : एफ १, तळ मजला, नंद-धान इंडस्ट्रियल इस्टेट, मरोळ, अंधेरी (पू.), मुंबई

वेळ : दुपारी १२ ते सायंकाळी ५


हेही वाचा

कुत्रा पाळायचाय? मग त्याआधी हे वाचा


पुढील बातमी
इतर बातम्या