Advertisement

फिरायला जायचंय? पण घरातल्या डॉगीचं करायचं काय? आता नॉट टू वरी!


फिरायला जायचंय? पण घरातल्या डॉगीचं करायचं काय? आता नॉट टू वरी!
SHARES

कॅफे म्हटलं की डोळ्यांसमोर येते प्रसन्न असणारी जागा, डिझायनर कपमध्ये दिली जाणारी गरमागरम कॉफी, त्याच्या जोडीला सँडविच, ब्राऊनिज किंवा आणखी काहीतरी! आपल्या कल्पनेतील कॅफे ही अशीच असतात. पण कॅफेच्या पुढे 'पेट' हा शब्द जोडला की एक वेगळीच संकल्पना जन्माला येते. 'पेट कॅफे' ही संकल्पना परदेशात जास्त आढळते. पण हळूहळू ही संस्कृती मुंबईत देखील रूजू होत आहे. 'पेट कॅफे' ही संस्कृती मुंबईकरांसाठी काही नवीन राहिली नाही. आता यात आणखी एक भर पडली आहे, ती म्हणजे 'डॉग हॉस्टेल'ची. 'डॉग हॉस्टेल' ही एक हटके आणि नवीन संकल्पना आहे.



काय आहे 'डॉग हॉस्टेल' संकल्पना?

कुत्रा हा आता कुटुंबातील एक महत्त्वाचा सदस्य आहे. अनेकांच्या जिव्हाळ्याचा कुत्रा बहुतांश घरात आढळतो. मात्र घरात पाळलेला कुत्रा असल्यावर बाहेरगावी सुट्टी घालवायला जाणं थोडं कठीण होतं. अशाच लोकांची अडचण ओळखून अंधेरीत 'डॉग हॉस्टेल' सुरू करण्यात आलं आहे. अंधेरीत 'पॉफेक्ट लाइफ' हे डॉग हॉस्टेल सध्या प्राणीप्रेमींसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे.



तुम्हाला बाहेरगावी जायचं असेल तर तुम्ही तुमच्या कुत्र्यांना इथं ठेवू शकता. पाळीव प्राण्यांबद्दल प्रेम निर्माण करणं, त्यांची काळजी घेणं आणि त्यांच्या संरक्षणाची आणि संगोपनाची जबाबदारी पार पाडणं हा 'डॉग हॉस्टेल'चा हेतू आहे. त्यांची तिकडे योग्यप्रकारे देखभाल केली जाते. त्यांच्या खाण्या-पिण्यापासून ते त्यांच्या आरोग्याबद्दल ऐकूणच सर्वच काळजी घेतली जाते.



हॉस्टेलला तुम्ही देखील भेट देऊ शकता?

तुम्हाला या कुत्र्यांसोबत वेळ घालवायचा असेल, तर तुम्ही नक्कीच या हॉस्टेलला भेट देऊ शकता. वेगवेगळ्या जातीचे कुत्रे तुम्हाला इथं पहायला मिळतीत. त्यापैकी काहींची नावं तर हटकेच आहेत. बिरा, फ्रॉस्टी, शुगर अशा क्यूट डॉग्ससोबत तुम्ही वेळ घालवू शकता. अनेक जणं या हॉस्टेलला भेट देत असतात. दुपारी १२ ते संध्याकाळी ५ दरम्यान तुम्ही या हॉस्टेलला भेट देऊ शकता.



किती शुल्क?

या 'डॉग हॉस्टेल'ला भेट देण्यासाठी एका तासासाठी तुमच्याकडून २൦൦ रुपये आकारले जातात. तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवू शकता. पण त्यांना फेरफटका मारण्यासाठी बाहेर घेऊन जाऊ शकत नाही. तसंच त्यांना तुम्ही काही खायला देखील नाही देऊ शकत.



हेही वाचा

मुंबईत ‘पेट गार्डन’ साकारायला महापालिकेचा नकार


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा